मालवण पुतळा प्रकरण:अजित पवारांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चा, सत्तेत असून करणार आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या घटनेविषयी महायुतीच्या सरकारची अडचण झाली असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने या प्रकरणात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. गुरुवारी राज्यभरातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एक तास मूक आंदोलन करण्यात येणार आहे. पुतळा दुर्घटनेसाठी सरकारवर जोरदार टीका होत असताना त्याचे उत्तर देण्याची जबाबदारी असलेल्या सरकारमधील पक्षानेच अशी भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे. पुतळा प्रकरणाची जवाबदारी जणूकाही शिवसेना (शिंदे) व भाजप या दोन पक्षांची असल्यासारखी भूमिका अजित पवार यांची राष्ट्रवादी घेत असल्याने भाजपच्या गोटात याविषयी प्रचंड संताप आहे.

मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळील छत्रपतींचा पुतळा पडल्यापासून राज्यभरात केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. हा पुतळा पडण्यामागे भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता असल्याचेही विरोधकांकडून बोलले जात आहे.
Maharashtra Politics: एवढ्या मोठ्या नेत्याला अशी विधाने करणे शोभत नाही; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार

घटनेनंतर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वप्रथम एक्सवर महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय,मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. कोणी या पक्षाचा असो, की त्या पक्षाचा असो, कोणी सत्तेत असो की विरोधात असो… भावना सर्वांच्याच तीव्र आहेत. कारण छत्रपती हे राजकारणाचे नव्हे तर अस्मितेचे प्रतिक आहेत, असे एक्सवर लिहिले.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडून या घटनेवर राजकारण करु नये, असे आवाहन करत असतानाच सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीकडूनच प्रतिक्रिया येत होत्या. त्यातच बुधवारी दुपारी या घटनेचा निषेध म्हणून आंदोलन करावे, अशा प्रकारचे परिपत्रक सर्व पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
Bacchu Kadu : राजकोट किल्ल्यावर जाऊन पंतप्रधान मोदी, फडणवीसांनी उठाबशा काढाव्यात, बच्चू कडूंची टीका

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी बुधवारी दुपारी काढलेल्या परिपत्रकात छत्रपतींच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रूटी झाल्याचे नाकारता येत नाही. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडून नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात सकाळी ११ ते १२ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. तालुकास्तरावर तहसीलदार व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांना या घटनेच्या निषेधाचे निवेदन द्यायचे आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्याविरोध्द अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात येणार आहे. तसेच त्याच ठिकाणी शक्तीशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी मागणी पक्षाकडून करण्यात येईल, असे लिहिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी भर सभेत महाराष्ट्रातील जनतेची पुतळा दुर्घटनेप्रकरणी माफी मागितली. त्यानंतर थेट आंदोलनाचीच हाक दिल्याने अजित पवार सरकारची कोंडी करत आहेत की सरकार म्हणून जबाबादारी झटकत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Source link

maharashtra politics latest newsmaharashtra politics newsmaharashtra politics news todayShivaji Maharaj Statue Collapsedsilent protest by ncp on statue collapsedअजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार बातम्याछत्रपती शिवाजी महाराजमालवण पुतळा प्रकरणमालवण पुतळा प्रकरण मूक आंदोलन
Comments (0)
Add Comment