निवडणूक जवळ आली म्हणून पुतळ्यावरुन राजकारण
नारायण राणे म्हणाले की, ”मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याच गोष्टीचा निवडणुका जवळ आल्या म्हणून विरोधक उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट व काँग्रेस हे सगळे एकत्र येऊन राजकारण करत आहेत. मालवण येथे पुतळा स्थानापन्न झाला. मालवण येथील जनता महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाली. पण आज आलेले महाविकास आघाडीचे नेते गेल्या आठ महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाहीत कधी दिसले नाहीत. आम्हाला याबाबत कोणतेही राजकारण करायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहावा व या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई हेच आमचे ध्येय आहे. असं राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
एकातरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला आहे का ?
राणे पुढे म्हणाले की, ”या महाविकास आघाडी मधील एकातरी नेत्याने कोणत्या एकातरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला आहे का? एखादी शाळा एखादी बालवाडी एखाद्या धार्मिक स्थळ या कशामध्येही यांचं योगदान नाही. भाजपने आत्ताच्या एकनाथ शिंदे सरकारने केलेल्या कामावर आरोप करण्यापलीकडे यांचे एकही सामाजिक कार्य नाही” असा हल्लाबोल राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, ”शिवद्रोही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केल्याचे माझ्या कानावर आले पण या उद्धव ठाकरेकडून दुसऱ्या कोणत्या भाषेची अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुत्व या दोन विषयावर शिवसेनेने स्थापनेपासून उदरनिर्वाहाचे साधन बनवलं. उद्धव ठाकरे यांनी एक तरी पुतळा उभा केला का स्वतःच्या वडिलांचा पुतळा सुद्धा सरकारच्या खर्चाने बनवणार आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांना बोलण्याचा अधिकारच नाही त्याला चांगलं बोलता येत नाही शिव्या घालणे यापलीकडे त्याला दुसरं काही कळत नाही अशा शब्दात ठाकरेंवर टीका केली आहे.