दीपक केसरकर हे अफजलनाखानाची औलाद, बुटाने मारले पाहिजे-संजय राऊत

म. टा. विशेष प्रतिनिधी

दीपक केसरकर यांना बुटाने मारले पाहिजे. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असली सडक्या विचाराची माणसे आमच्यातून निघून गेली, हे बरेच झाले, अशा शब्दांता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका केली.

सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुद्द्यावरुन शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरे झाले, त्यामधून काही चांगले होईल, असे दीपक केसरकरांना वाटते. हे शब्द केसरकरांच्या तोंडातून कसे निघू शकतात. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेत. हे सगळे शिवाजी महाराजांचे का इतके शत्रू झालेत, हे माहिती नाही. हे देवेंद्र फडणवीस यांचे पाप आहे. मिंधे यांची टोळी पोसण्याचे काम फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी केले. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पडला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Ajit Pawar Silent Protest: मालवण पुतळा प्रकरण:अजित पवारांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चा, सत्तेत असून करणार आंदोलन

या पुतळ्यामागे ठाणे संबंध आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुत्राचा यामध्ये संबंध आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वाखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे. तसेच शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सुरु झालेले आंदोलन संपणार नाही. मी ३० तारखेला तिकडे स्वत: जाणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
Maharashtra Politics: एवढ्या मोठ्या नेत्याला अशी विधाने करणे शोभत नाही; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार

राणेंवर टीका…

नारायण राणे या माणसाला वेड लागले आहे. इमारती कोसळणे आणि पुतळा कोसळणे यामध्ये फरक आहे. राणे तुम्ही मराठी खासदार असून, असं बोलताय. शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाला आहे. हा आरोप नाही तर हे सत्य आहे. देवेंद्र फडणवीस ही तुमची पापं आहेत. तुमच्या भाजपच्या लोकांमुळेच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात पराभव झाला, असेही संजय राऊत म्हणाले.

Source link

controversial statement by deepak kesarkarmaharashtra politics latest newsmaharashtra politics news in marathimaharashtra politics news todaysanjay raut criticized deepak kesarkarShivaji Maharaj Statue Collapsedछत्रपती शिवाजी महाराजांचे विचारदीपक केसरकरमालवण पुतळा प्रकरणसंजय राऊत
Comments (0)
Add Comment