मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशाची पुनरावृत्ती करण्यास काँग्रेस सज्ज आहे. कारण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने नुकताच एक अंतर्गत सर्व्हे केला आहे. यामध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी मविआमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचे संकेत सर्व्हेतून मिळत आहेत. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा आघाडीतील सगळ्यात धाकटा भाऊ ठरण्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक अंतर्गत सर्वेक्षण घेतले. यानुसार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरवण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व्हेनुसार काँग्रेसला राज्यात २८८ पैकी ८५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रस : शरदचंद्र पवार पक्ष ५५ ते ६० जागा मिळवण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना राज्यात ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने लोकसभेला महाराष्ट्रात ४८ पैकी १७ जागा लढवल्या होत्या. त्यांना १७ पैकी १३ जागा मिळवण्यात यश आलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाने मविआत सर्वाधिक म्हणजे २१ जागा लढवल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकता आल्या. तर दहा जागा लढवलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० पैकी ८ जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीने एकूण ३० जागा जिंकल्या. तर सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटीलही मविआच्या सोबत आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अवघी एक जागा असलेल्या काँग्रेसने यंदा १७ पैकी १३ जागा जिंकल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास तर दुणावला आहेच, मात्र त्यांची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. मुंबईतील जागांवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. मविआच्या दोन बैठका जागावाटपाबाबत चर्चेसाठी झाल्या आहेत.

मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. ठाकरे गट २० ते २२ जागा लढवण्यावर ठाम असताना काँग्रेसलाही १८ जागांसाठी आग्रही आहे. याशिवाय शरद पवार गटानेही सात जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. यात काही जागा सामायिक असल्याने वाद होऊ शकतो.