अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महामार्ग विभागाने खड्डे बुजवावेत अशी मागणी जनतेमधून जोर धरत आहे. नातेवाईकाला मुलगा झाला म्हणून अपार्टमेंटमधील शेजारील मुलीला सोबत घेऊन जात असताना दोघांवर काळाची झळप आली आणि दोघांचा ट्रक खालील चिडून दुर्दैवी मृत्यू झाला.
नाशिकच्या दिक्षिता आल्या होत्या माहेरी
या अपघातात दिक्षिता राहुल पाटील या माहेरी आल्या होत्या. त्या नाशिकला वास्तव्यास आहे. त्यांचे माहेर धरणगाव तालुक्यातील रेल येथील आहे. आई-वडील हे जळगाव शहरातील वाटिका आश्रम जवळील द्वारकाही अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या नातेवाईकांचं निधन झाल्यामुळे त्या आपल्या मुलासह गेल्या आठ दिवसापासून जळगाव शहरात आल्या होत्या. पती राहुल पाटील हे नाशिकला फार्मा कंपनीत मॅनेजर आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा रुद्र, पती राहुल पाटील, वडील अर्जुन पाटील, आई आणि भाऊ असा परिवार आहे.
अपघात कसा झाला
दिक्षिता व पायल दुचाकीने पुलावरून जात असताना पूल उतरताना त्यांची दुचाकी ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये आली. दोन्ही वाहनांच्यामध्ये दुचाकी आली आणि त्यातल्या त्यात रस्त्यावर मधोमध खड्डा असल्यामुळे दुचाकी घसरली आणि दोघी ट्रकखाली आल्या. ट्रकखाली आल्यामुळे महिला आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर रुद्र ट्रक आणि ट्रॅक्टरच्या मधील जागेत पडल्यामुळे सुदैवाने बचावला.
खड्डे बुजवले असते तर अपघात टळला असता
दिक्षिता आणि पायल या दुचाकीने अक्षय वाघ यांच्या मुलाला पाण्यासाठी जात होते. मात्र, अक्षय वाघ यांनी दोघींना त्यांच्या चारचाकी वाहनातूनच जाण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयातून दोघांनाही शहरात खरेदी करायची असल्याने त्यांनी दुचाकीवरून जाण्याचा निर्णय घेतला. जर चारचाकी वाहनातून त्या निघाल्या असत्या तर कदाचित ही घटना टळली असती.