अबब! अडीचशे कोटींची कमिशनखोरी; लोकप्रतिनिधी-अधिकारी-ठेकेदारांच्या अभद्र युतीने नाशिकच्या रस्त्यांची लागली वाट
शहरातील रस्ते चकचकीत करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या पाच वर्षांत शहरातील रस्त्यांवर तब्बल एक हजार कोटींचा खर्च केला आहे. परंतु, महापालिकेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीमुळे हा खर्च पावसाळ्यात वाहून जात असल्याचे वास्तव आहे. पालिकेतील टक्केवारीने नाशिककरांच्या कराचे अडीचशे कोटी टक्केवारीपोटी या त्रिकुटाच्या खिशात जात असल्याने नाशिककरांच्या नशिबी दर पावसाळ्यात खड्ड्यांतून रस्ते शोधण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र आहे.