पोलीस धुताहेत शिंदेसेनेच्या आमदाराची कार! काँग्रेसकडून VIDEO शेअर, जिल्ह्यात खळबळ

Sanjay Gaikwad: पोलीस कर्मचारी शिंदेसेनेच्या आमदाराची कार धुवत असतानाचा व्हिडीओ काँग्रेसच्या माजी आमदाराने शेअर केला आहे. पोलीस लोकांच्या सुरक्षेसाठी की आमदारांच्या कार धुण्यासाठी असा सवाल त्यांनी विचारला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
बुलढाणा: शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची खासगी कार पोलीस धूत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आज त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या प्रकाराची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी गेलेले उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजप खासदार नारायण राणे, त्यांचे पुत्र निलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. त्यावेळी निलेश राणे पोलिसांवर संतापले. ते आवाज चढवून अरेरावीची भाषा करत होते. विशेष म्हणजे यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही कठोर भूमिका घेतली नाही. त्यामुळे पोलीस खात्याचे मनोबल खचत चालल्याची टीका होत असताना आता शिंदेसेनेच्या आमदाराची कार पोलीस कर्मचारी धुवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
BJP Maharashtra: लोकसभेला फटका, भाजपला धसका; वास्तवाची जाणीव होताच विधानसभेसाठी टार्गेट बदललं; आकडा ठरला
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं कार्यालय जयस्तंभ चौकात आहे. या कार्यालयाबाहेर उभी असलेली पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार एक पोलीस कर्मचारी धुवत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केला आहे. पोलिसांचं काम सुरक्षेचे आहे की आमदारांच्या गाड्या धुणे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या घडीला हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. आमदारांनी अद्याप तरी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘सध्या राज्यात महिला सुरक्षित नसताना आणि बुलढाण्यात अनेक अवैध धंदे फोफावलेले असताना पोलिसांचे नेमके काम, कर्तव्य काय होते आणि ते काय करत आहेत,’ असे प्रश्न सपकाळ यांनी विचारले आहेत. हा खाकी वर्दीवर लागलेला डाग असल्याची टीका त्यांनी केली आहे. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? महाराष्ट्र पोलीस शर्म करो! सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारे महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहेत की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी?’, असा सवाल माजी आमदारांनी केला आहे.

Source link

Maharashtra politicspolice washing mlas carsanjay gaikwadShiv Sena MLAshiv sena mla controversyपोलिसांकडून आमदाराच्या कारची सफाईपोलीस धुताहेत आमदाराची कारशिंदेसेनेचा आमदार वादातसंजय गायकवाड कारसंजय गायकवाड वादात
Comments (0)
Add Comment