मनोज जरांगेंनी दिला ‘आरपार’चा इशारा; राज्य सरकारला दिला नवा अल्टिमेटम, २९ सप्टेंबरला संपूर्ण राज्यात…

Maratha Reservation: आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाने आता राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. सरकारने २९ सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य न केल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे.

मराठी समाजाने त्यांच्या मागण्या राज्य सरकारला लिहून दिल्या आहेत. यासाठी सरकारला २९ सप्टेंबरची मुदत दिली आहे. २९ तारखेच्या आत आपल्या सर्व मागण्यात त्यांनी पूर्ण करायच्या आहेत, असे सांगत मनोज जरांगे यांनी सरकारकडे ही एवढी एकच संधी असल्याचे स्पष्ट केले. २९ सप्टेंबरनंतर मराठा समाज थांबू शकणार नाही, असे ते म्हणाले.

अंतरवली सराटी येथे बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस यांनी मराठा समाजावर लाठीचार्ज केला. त्यांनी सर्वांवर अन्याय केला आता २०२४ ला आमचा दणका कळेल, अशा शब्दात जरांगे यांनी इशारा दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी घेतलेली शपथ पूर्ण झाली नाही. सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत आमची फसवणूक झाल्याचे ते म्हणाले.
NCP Protest: आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

आपल्या आंदोलनाला एक वर्ष झाले. तरी प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आता मागे हटणार नाही. मराठा समाज असा एकजूट राहिला तर हा प्रश्न सुटेल. आता आपल्याला २९ सप्टेंबर रोजी उपोषण करायचे आहे आणि ते राज्यभर असेल. हे उपोषण शेवटचे आणि आरपारचे उपोषण असेल असे देखील जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगेंनी दिला ‘आरपार’चा इशारा; राज्य सरकारला दिला नवा अल्टिमेटम, २९ सप्टेंबरला संपूर्ण राज्यात…

लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंद्याला काही होऊ नये- सोलापुरातील मराठ्यांची मनोज जरांगे पाटलांना विनंती

सोलापूर: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर राज्यातील मराठा बांधव चिंतेत पडला आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सारख्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी प्रतिक्रिया सोलापुरातील मराठा समाज बांधवानी दिली आहे.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

manoj jarange given ultimatum to governmentmanoj jarange patil latest newsmaratha aarakshanओबीसी आरक्षणमनोज जरांगे पाटीलविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment