आजचे पंचांग 30 ऑगस्ट 2024: जरा-जिवंतिका पूजन, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

शुक्रवार ३० ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ८ भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण द्वादशी उत्तररात्री २-२४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुनर्वसू सायं. ५-५५ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन सकाळी ११-३३ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मघा दुपारी ३-४५ पर्यंत

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति श्रावण, शक संवत १९४६, श्रावण द्वादशी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१ सौर श्रावण मास प्रविष्टे १५, सफर २४, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३० ऑगस्ट २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, द्वादशी तिथी मध्यरात्री २ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ

पुनर्वसु नक्षत्र सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वरियान योग प्रारंभ, कौलव करण दुपारी २ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२४
  • सूर्यास्त: सायं. ६-५४
  • चंद्रोदय: उत्तररात्री ३-५०
  • चंद्रास्त: सायं. ४-३९

  • पूर्ण भरती: सकाळी १०-०६ पाण्याची उंची ३.८१ मीटर, रात्री १०-०२ पाण्याची उंची ३.२२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-०६ पाण्याची उंची १.३४ मीटर, सायं. ४-२१ पाण्याची उंची १.९४ मीटर
  • आजचे व्रत, सण : जरा जिवंतिका पूजन, वत्स द्वादशी (पूजा), स्वामी स्वरुपानंद पुण्यतिथी पावस, संत सेना महाराज पुण्यतिथी, संत नारायण महाराज पुण्यतिथी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून १३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपासून ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांपासून ते ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपासून ते ९ वाजून १० मिनिटांपर्यत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपासून ते ९ वाजून २३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर १२ वाजून ४७ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
माता लक्ष्मीची आराधना करा तसेच मातेसाठी सफेद रंगाचे आसन वापरा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

30 august daily panchang30 ऑगस्ट दिनविशेष30 ऑगस्ट पंचांग 2024 मराठीतpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगजरा-जिवंतिका पूजन marathi panchang
Comments (0)
Add Comment