Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथेतील राजकोट किल्ला परिसरात राणे समर्थक आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते यांच्यात झाल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी ४२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजकोट किल्ला येथील कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणी दरम्यान बुधवारी राणे व ठाकरे समर्थक समोर आल्यानंतर मोठा राडा झाला होता. राणे समर्थक व ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या सगळ्या प्रकरणात संभाजी पाटील, मेहक परब हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या सगळ्या राडा प्रकरणाची गंभीर दखल घेत गर्दी ,मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशचा भंग करणे सार्वजनिक बांधमतेचे नुकसान करणे अशा प्रकारची एकूण भारतीय न्याय दंड संहिता यानुसार एकूण नऊ प्रकारची विविध कलम दाखल करण्यात आली आहेत.
भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 नुसार 191(2),121(2),189(2),190,118(2),223, तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम,1984 3, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1),37(3) या कलमानुसार हे गुन्हे दाखल झाले आहेत.
शासकीय कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, दगडफेक करणे, पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग, शासकीय मालमत्तेच नुकसान अशा स्वरूपाचा गुन्हा केल्याप्रकरणी एफ आय आर नोंदवण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्या मार्गदर्शक आणि पोलीस उपनिरीक्षक एस एस खाडे अधिक तपास करीत आहेत.
नाव सांगण्यास पोलीस निरीक्षकाचा नकार
मात्र या 42 जणांची नावे सांगण्यास मालवण पोलिसांनी नकार दिला आहे. ही नाव आम्हाला सांगता येणार नाहीत. गुन्हा दाखल करण्यात आलेला एफआयआर ही पब्लिक कॉपी असते. मात्र तरीही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची 42 जणांची नावे सांगण्यास मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी नकार दिला आहे.
Rajkot Fort Rada: राजकोट राड्या प्रकरणी ४२ जणांसह दीडशे अनोळखी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल; नावे सांगण्यास पोलिसांचा नकार
दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजकोट व मालवण परिसरात चोख पोलीस बंदोबस्त यांना करण्यात आला आहे. एसआरपीएफची 100 जणांची तुकडी तैनात आहे तसेच जिल्हा राखीव पोलिसातील 30 ,स्थानिक पोलीस 30 असे एकूण 160 जणांचा पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. मालवण राजकोट परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.