आपटे, हे सगळं ठरवून केलं काय? याच भरवशावर कंत्राट मिळवलं? अमोल मिटकरींना संशय

Jaydeep Apte : शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीचा योग्य वापर न करता निकृष्ट बांधकाम करून सरकारची फसवणूक आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले, अशी तक्रार त्यांनी जयदीप आपटे (प्रोप्रायटर, मेसर्स, आर्टिस्टरी) आणि डॉ. चेतन एस. पाटील (स्ट्रक्चरल कन्सलटंट) यांच्याविरोधात केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अमोल मिटकरी-जयदीप आपटे
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या अटकेची मागणी होत असताना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा आठ महिन्यांतच, सोमवारी कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणी मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अजित पाटील यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीचा योग्य वापर न करता निकृष्ट बांधकाम करून सरकारची फसवणूक आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले, अशी तक्रार त्यांनी जयदीप आपटे आणि डॉ. चेतन एस. पाटील यांच्याविरोधात केली. पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी जयदीप आपटे याचा शोध सुरू केला आहे, परंतु आपटे फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. यादरम्यान अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करून शिल्पकार आपटेवर गंभीर आरोप केले आहेत.
Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा का? दोषींना BNS अंतर्गत किती वर्ष कारावास?

जखम असलेला पुतळा बनवून आपटेला काय सांगायचे होते?

ठाण्यातील आपटे नावाच्या एका नवख्या शिल्पकाराने छत्रपतींचा पुतळा बनविला. या पुतळ्यावर, छत्रपतींच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवर एक खोच (जखम) दाखविण्यात आली आहे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याने वार केला होता. त्यामध्ये महाराजांना छोटी इजा झाली होती. मात्र असा जखम असलेला पुतळा बनवून आपटेला काय सांगायचे होते? या संदर्भात त्याने सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तरावरून यात त्याचा काही छुपा अजेंडा होता का? असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला.
मालवणमध्ये पोलिसांवर गुंड थुंकले, शिव्या दिल्या, गृहमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, संजय राऊतांनी सुनावले

आपटे, हे सगळं ठरवून केलं काय?

आपटे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पात खोप का दाखवली? या मागचा इतिहास काय आहे? सर्व ठरवून केलंय का? की याच भरवशावर कंत्राट मिळवलं? जबाब तो देना पडेगा, असे मिटकरी म्हणाले.

आपटे, महाराजांच्या भुवईवर वार का दाखवला? छुपा अजेंडा आहे का? म्हणूनच कंत्राट मिळालं का? मिटकरींचे सवाल

महाराज माफ करा… कुण्या तोंडानं माफी मागावी?

महाराज माफ करा… कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने देदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडून पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय, मात्र ज्याला कंत्राट दिले त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी, अशी पोस्ट एक्स माध्यमावर लिहून अमोल मिटकरी यांनी सरकारी व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली.

लेखकाबद्दलअक्षय आढावअक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड…. आणखी वाचा

Source link

Amol MitkariAmol Mitkari Slam Jaydeep ApteChhatrapati Shivaji Maharaj Statue MalvanWho is Jaydeep Apteअमोल मिटकरीअमोल मिटकरी जयदीप आपटे टीकाछत्रपती शिवाजी महाराज पुतळाजयदीप आपटे कोण आहे
Comments (0)
Add Comment