मासिक टॅरोकार्ड राशीभविष्य सप्टेंबर २०२४ : कन्यासह ४ राशींच्या उत्पन्नात वाढ! नात्यात तणाव, टॅरो कार्डनुसार कसा असेल सप्टेंबर महिना, वाचा राशीभविष्य

September Month Tarot Card Bhavishya : सप्टेंबर महिन्यात ग्रहांची अतिशय शुभ स्थिती असणार आहे. या महिन्यात शुक्र आणि सूर्याच्या संयोगामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होईल. त्यामुळे संपत्ती आणि ऊर्जेत वाढ होईल. शुक्रादित्य योगामुळे या महिन्यात अनेक राशींना लाभ, प्रगती आणि उत्पन्नात वाढ होईल, तसेच संपत्तीत सुख मिळेल. मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी सप्टेंबर महिना कसा असेल जाणून घेऊया. सप्टेंबर महिन्याचे टॅरो राशीभविष्य सविस्तर वाचा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मासिक टॅरोकार्ड राशीभविष्य सप्टेंबर २०२४ : कन्यासह ४ राशींच्या उत्पन्नात वाढ! नात्यात तणाव, टॅरो कार्डनुसार कसा असेल सप्टेंबर महिना, वाचा राशीभविष्य
Masik September Tarot Card Prediction 2024 :
सप्टेंबर महिन्यात ग्रहांची अतिशय शुभ स्थिती असणार आहे. या महिन्यात शुक्र आणि सूर्याच्या संयोगामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होईल. त्यामुळे संपत्ती आणि ऊर्जेत वाढ होईल. शुक्रादित्य योगामुळे या महिन्यात अनेक राशींना लाभ, प्रगती आणि उत्पन्नात वाढ होईल, तसेच संपत्तीत सुख मिळेल.
मेष, कर्क, तुळ आणि धनु राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात टॅरोकार्डनुसार हा महिना लाभाचा असेल. या राशींच्या कामाच्या ठिकाणी यश आणि संपत्तीत वाढ होईल. मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी सप्टेंबर महिना कसा असेल जाणून घेऊया. सप्टेंबर महिन्याचे टॅरो राशीभविष्य सविस्तर वाचा.

मेष – पैसे उधार देऊ नका

मेष राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्डनुसार हा महिना राजकीय प्रभावात वाढ करेल. या महिन्यात तुमचे विरोधक पराभव स्वीकारतील. दीर्घकाळापासून त्रस्त असणाऱ्या आजारातून सुटका होईल. कुणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा परत मिळणार नाही. विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात तुमच्या कार्यक्षेत्रात यश आणि प्रगतीच्या संधी येतील.

वृषभ – आरोग्याची काळजी घ्या

वृषभ राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्डनुसार सप्टेंबर महिना तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. तुम्हाला जुन्या कामातून लाभ मिळू शकतो. तुम्ही या काळात नवीन काम सुरु करु शकता. या महिन्यात मित्रांकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत अनुकूल निकाल मिळतील. आरोग्याच्या संबंधित काही समस्या निर्माण होतील. आरोग्याबाबत निष्काळजीपणा दाखवू नका.

मिथुन – नात्यात तणाव येईल

टॅरो कार्डनुसार मिथुन राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात सावध राहावे लागेल. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. तुमच्याविरुद्ध कट रचले जातील. जोडीदारासोबत काही मुद्द्यावरुन तणाव निर्माण होईल. मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. या महिन्यात शनिदेवाची उपासना फायदेशीर ठरेल.

कर्क – रखडलेली कामे पूर्ण होतील

टॅरो कार्डनुसार कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा असेल. या महिन्यात रखडलेले कामे पूर्ण होतील. या महिन्यात तुमचे सर्व काम पूर्ण होईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. लांबचा प्रवास करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

सिंह – मन शांत राहिल.

सिंह राशीच्या लोकांना टॅरो कार्डनुसार सप्टेंबर महिन्यात कोणतेही काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांचा पाठींबा मिळेल. चांगले संबंध तयार होतील. तुमचे मन शांत राहिल. भविष्यातील अडचणी दूर होतील.

कन्या – उत्पन्नात वाढ

टॅरो कार्डनुसार कन्या राशीसाठी सप्टेंबर महिना अनुकूल असेल. एखाद्या जुना मित्र तुम्हाला भेटेल. प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर असेल. विद्यार्थी अभ्यास चांगला करतील. या राशीच्या विवाहित जोडप्यांसाठी हा काळ चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

तुळ – उत्पन्नाचे नवीन स्त्रोत

टॅरो कार्डनुसार सप्टेंबर महिना तुळ राशीसाठी लकी असेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रतिकूल असेल. आरोग्याबाबत तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. कायदेशीर वादांपासून अंतर ठेवावे लागेल. कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा

वृश्चिक – कामात अडचणी

टॅरो कार्डनुसार वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना अतिशय काळजीपूर्वक असणार आहे. कामात उशीर करु नका. शत्रूमुळे तुम्हाला नुकसान होईल. जोडीदारासोबत तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. सतत नवीन अडचणी येतील.

धनु – संपत्ती वाढ

धनु राशीसाठी सप्टेंबर महिना टॅरो कार्डनुसार संपत्ती वाढ करणारा असेल. तुमच्या आनंदात वाढ होईल. मालमत्तेशी संबंधित कामात प्रगती होईल. घर घेण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होईल. नशिब अचानक चमकेल. या महिन्यात नवीन वाहन खरेदी कराल. कामाचे कौतुक होईल.

मकर – वाद होतील

मकर राशीच्या लोकांसाठी टॅरो कार्डनुसार हा महिना ग्रहांच्या स्थितीनुसार अनुकूल नसेल. जोडीदारासोबत वाद होतील. विवाहित जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतील. नवीन ऊर्जा तुमच्या नात्यात संचारेल. कामाच्या ठिकाणी अडथळे येतील.

कुंभ – आरोग्याची काळजी घ्या

टॅरो कार्डनुसार कुंभ राशीसाठी हा महिना अनुकूल नसेल. योजनांनुसार काम करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक समस्या उद्भवतील. कामाच्या ठिकाणी परिस्थितींचा सामना करावा लागेल. आरोग्यासाठी हा महिना चांगला नसेल.

मीन – कामात अधिक मेहनत घ्या

टॅरो कार्डनुसार सप्टेंबर महिना मीन राशीच्या लोकांसाठी कामात अडथळे आणू शकतो. मेहनतीचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळेल. तुमची सर्व कामे प्रत्यक्षात उतरु शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. कामात नवीन दिशा मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra times money rashi bhavishyarashi bhavishya SeptemberSeptmber lucky horoscopeSeptmber Month Lucky ZodiacsSeptmber Tarot card ZodiacsSeptmber Tarot card Zodiacs In Marathizodiac is Tarot card in money?कसा असेल सप्टेंबचा महिना?कुंडली विषयी बातम्याकोणत्या राशींसाठी टॅरोकार्डनुसार लकी ठरेल सप्टेंबर महिनासप्टेंबर राशिभविष्य महाराष्ट्र टाइम्स
Comments (0)
Add Comment