Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय गृहखात्याकडून झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे.
केंद्रीय गृहखात्याला कोणत्या अशा गोष्टींमुळे शरद पवारांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे वाटते, त्या सर्व संभाव्य धोकादायक बाबीची यादी थेट पवारांनी गृहखात्याकडे मागितली आहे. याआधी सुद्धा शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षेसाठी विचारणा करण्यात आली होती तसेच सुरक्षा देण्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते पण शरद पवारांनी सुरक्षा नाकरली होती.
काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा देण्याचा मानस केंद्र सरकारने केला असता शरद पवारांनी ही एक प्रकारची गुप्तहेरगिरी करण्याची पद्धत असे म्हणत केंद्रांची झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला. झेड प्लस सुरक्षेत सीआरपीएफचे ५८ कमांडो असतात जे नेहमी शरद पवार यांची सुरक्षा करतील.