सुजय विखेंचा अर्ज निकाली काढल्याचे वृत्त चुकीचे; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Sujay Vikhe Patil: लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीबाबतची याचिका निकाली काढल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाने सांगितले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पुणे/नगर: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये ‘चेकींग अँड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी/मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ बाबत केलेला अर्ज भारत निवडणूक आयोगाने निकाली काढल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून डॉ. सुजय राधाकृष्ण विखेपाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू असून सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे.

‘चेकींग अँड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी/मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ बाबत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ जे निर्देश देतील त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Checking & Verification Of Evm & Vvpatlok sabha elections 2024sujay vikhe patil petitionअहमदनगर लोकसभा मतदारसंघडॉ. सुजय विखे पाटीलनिवडणूक आयोग
Comments (0)
Add Comment