Ambabai Devi Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला एका भक्ताने ७१ तोळ्यांचा सोन्याचा सिंह अर्पण केला आहे. या सोन्याच्या सिंहाला पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.
Kolhapur News : करवीर निवासिनी अंबाबाईला भक्ताकडून ७१ तोळ्यांचा सुवर्णसिंह अर्पण, किंमत ऐकून थक्क व्हाल
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. अनेक भक्तांकडून देवीला वेगवेगळ्या स्वरूपात वस्तू दान केल्या जातात. अंबाबाईच्या एका भक्ताने पाऊण किलो सोनं आणि सव्वा दोन किलो चांदी पासून बनवलेला सिंह अंबाबाई देवीला अर्पण केला आहे.
Shirdi News : साईंच्या चरणी सुवर्ण दान! दानशूर भाविकाकडून ४२ लाखांचा सोन्याचा मुकूट अर्पण
आई अंबाबाई देवीच्या खडी पूजेवेळी सोन्याने मढवलेल्या या सिंहाच्या प्रतिकृतीचा समावेश पूजेमध्ये करण्यात आला आहे. यावेळी आरतीसाठी जमलेल्या हजारो भाविक, भक्तांनी अंबाबाई देवीच्या उत्सवमूर्तीचं दर्शन घेतल. आकर्षक कलाकुसर आणि देखण्या रूपातील या सोन्याच्या सिंहाला पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने खडी पूजेसाठी वापरण्यात आलेला सुवर्ण सिंह रीतसर पावती करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या खजिन्यात जमा करण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी यांनी दिली आहे. यंदाच्या नवरात्र उत्सव काळात भक्ताकडून अर्पण झालेला हा सुवर्ण सिंह ठेवण्यात येणार असू भाविकांना अंबाबाईसोबत पूजेत हा सुवर्णसिंह पाहता येणार आहे.
दरम्यान, शिर्डीतील साईबाबांना नववर्षाच्या सुरुवातीला एका महिलेने २२३ ग्रॅम वजनी आणि १२ लाख १७ हजार रुपये किमतीचं सोन्याचं फुल अर्पण केलं होतं. महिलेने आपल्या पतीच्या स्मरणार्थ सोन्याचं फुल साईबाबा संस्थानला देणगी म्हणून दिलं होतं. याच वर्षी जून महिन्यात, एका व्यक्तीने साईंच्या चरणी ४२ लाखांचा सोन्याचा मुकूट अर्पण केला होता.