Haryana Election : विनेश फोगाट राजकरणात येणार? शेतकरी आंदोलकांच्या भेटीमुळे पुन्हा चर्चा

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव गाजवणारी विनेश फोगाट हिने आज आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विनेश फोगट राजकारणात येणार?
मुंबई : मागील एक महिना विनेश फोगाट देशात चर्चेचा विषय बनला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश दमदार खेळी खेळली. पण फक्त अंतिम सामन्यात १०० ग्राम वजन वाढल्यामुळे विनेशची रिंगणात उतरण्याची संधी हुकली. विनेश आता मायदेशी परतली असून सध्या तिच्या मूळगावी कुटुंबासोबत आहे. विनेशचे स्वागत मात्र मायभूमीत येताच काँग्रेसकडून दणक्यात करण्यात आले आहे. काँग्रेसने केलेल्या स्वागतानंतर विनेश राजकरणात सक्रिय होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. आज विनेशने शंभू बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला भेट दिली आहे. यावेळी पत्रकारांनी थेट राजकरणात सक्रिय होणार का असा सवालच विनेश फोगाट यांना केला.
Vinesh Phogat: विनेश लवकरच सत्य सांगणार; ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारावर करणार मोठा खुलासा

हरियाणात येत्या एक ते दीड महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. अशातच विनेश फोगाट यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे तसेच शेतकऱ्यांसाठी थेट सरकारकडे विनंती करणे या कृतीमुळे पुन्हा एकदा विनेश फोगाट यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. विनेश फोगाट यांना पत्रकारांनी थेट काँग्रेसमधून लढणार का असा सवाल केला आहे. यावर विनेश म्हणाल्या मी राजकरणावर काही भाष्य करणार नाही. जर तुम्ही राजकरणाचे बोलायला आला असेल तर तुम्ही शेतकऱ्यांचा लढा आणि संघर्ष उद्ध्वस्त करताय. निवडणुकांचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी फक्त शेतकऱ्यांचा लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आली आहे. सरकारने शेतकरी प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे.२०० दिवस झाले शेतकरी बसेल पण सरकाराचे दुर्लक्ष आहे अशी भूमिका विनेश फोगाट यांनी बोलून दाखवली.

Haryana Election : विनेश फोगाट राजकरणात येणार? शेतकरी आंदोलकांच्या भेटीमुळे पुन्हा चर्चा

माझ्यावर आणि राजकरणावर फोकस करण्यापेक्षा शेतकऱ्यावर फोकस करा असा सल्ला विनेश फोगाट यांनी पत्रकारांना दिला आहे. तुम्ही राजकरणावर भाष्य करत आहात त्यामुळे आंदोलन दुर्लक्षित होत आहे. मी संपूर्ण देशाची खेळाडू आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी विनंती विनेशने केली. “मी सरकारला त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती करतो. मागच्या वेळी त्यांनी आपली चूक मान्य केली होती, त्यांनी दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत. लोक असेच रस्त्यावर बसून राहिले तर देश पुढे जाणार नाही,” असे फोगाट म्हणाली.

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

farmer protestvinesh phogat visit farmer on protest locationकाँग्रेस पक्षकिसान मोर्चाविनेश फोगाटविनेश फोगाट राजकरणात येणारशेतकरी आंदोलनहरियाणा निवडणुका
Comments (0)
Add Comment