‘बहिणीं’ना घेऊन जाणारा बसचालक नशेत; ऑटोरिक्षाला धडक, महिलेने घेतली उडी; नागपुरातील थरारक घटना

Nagpur News: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणाचा कार्यक्रम शनिवारी रेशीमबाग मैदानावर झाला. कार्यक्रम संपल्यानंतर एमएच ३१ डीएस १५३८ या क्रमांकाची बस महिलांना परत घेऊन जात होती.

महाराष्ट्र टाइम्स
accident
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : रेशीमबाग येथील ‘लाडकी बहीण’ कार्यक्रम आटोपून लाडक्या बहिणींना घेऊन जाणाऱ्या मद्यधुंद बसचालकाने ऑटोरिक्षाला धडक दिली. यात ऑटोचालक जखमी झाला. तर, जिवाच्या भीतीने एका महिलेने या बसधून उडी घेतली. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा चौक परिसरात घडली.

नेमकं काय घडलं?

मजहर खान (वय २९, रा. भालदारपुरा), असे जखमी ऑटोचालकाचे तर संदीप डोंगरे (वय ४०, रा. रुईपांजरी) असे मद्यधुंद बसचालकाचे नाव आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणाचा कार्यक्रम शनिवारी रेशीमबाग मैदानावर झाला. कार्यक्रम संपल्यानंतर एमएच ३१ डीएस १५३८ या क्रमांकाची बस महिलांना परत घेऊन जात होती. संदीप हा दारू पिऊन बस चालवित होता. मानेवाडा चौक परिसरात एमएच ४९ सीएफ २४८१ क्रमांकाच्या ऑटोला मागून बसने धडक दिली. ऑटो उलटल्याने मजहर खान जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर एका महिलेने बसमधून उडी घेतली. बसचालक संदीप हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच नागरिकांनी त्याला पकडले. तेथे तैनात पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या तावडीतून त्याची सुटका करीत हुडकेश्वर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी संदीपविरुद्ध अपघातासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

हा वडापल्लीवार कोण आहे माहीत आहे का? विरोधकांवर हल्लाकरत देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना दिले मोठे आश्वासन
लाडकी योजना बंद पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हमी
नागपूर :
लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीजबिल माफ, एसटीत ५० टक्के सवलत, गुलाबी ई-रिक्षा, शुभमंगल योजना, पीक विमा योजना यांसारख्या योजना सुरू करून आम्ही चूक केली का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लाडकी बहिणींना विचारत विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, अशी हमीही त्यांनी यावेळी बहिणींना दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला काँग्रेसचा विरोध असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवार यांनी ‘लाडकी बहीण योजना’ बंद व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण’ कार्यक्रमात केला. ‘मोठा वकील लावू, पण योजना बंद पडू देणार नाही’, असा शब्दांत लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हमी दिली.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bus driver accidentladki bahin bus accidentladki bahin yojana updatenagpur bus accidentNagpur newsताज्या मराठी बातम्यामानेवाडा चौक नागपूर अपघातमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाहुडकेश्वर पोलिस स्टेशन
Comments (0)
Add Comment