महाविकास आघाडीच्या ‘जोडे मारो’ आंदोलन, पवार- ठाकरेंसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

Mahavikas Aghadi Jode Maro Andolan : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान, त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला प्रतिसाद
  • ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष सुरु
  • पवार- ठाकरेंसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा २६ सप्टेंबरला कोसळला अन् महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

शिवरायांच्या नावाची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान, त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

आधी या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असं असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिगेटही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Jode Maro Andolanmahavikas aghadimahavikas aghadi jode maro andolanSharad PawarUddhav Thackerayउद्धव ठाकरेजोडे मारो आंदोलनमहाविकास आघाडी जोडे मारो आंदोलनमुंबई बातम्याशरद पवार
Comments (0)
Add Comment