मविआचं जोडे मारो आंदोलन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले यांना…

Eknath Shinde on Jodo Maro andolan : विरोधक दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात जातीजातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता.

हायलाइट्स:

  • मविआचं जोडे मारो आंदोलन
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
एकनाथ शिंदे जोडे मारो आंदोलन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया असा मोर्चा महाविकास आघाडीने काढला. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला गेला. यावेळी गेट वे ऑफ इंडिया परिसरात सरकारला जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडीने केलं. यावेळी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. या आंदोलनावर मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले…

विरोधक दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात जातीजातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण राज्यातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसत आहे. लोकसभेत खोटं नरेटिव्ह पसरवून आरक्षण जाणार, संविधान बदलणार हे होणार ते होणार सांगून लोकांमध्ये भीती पसरवून मते मिळवली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Uddhav Thackeray: माफी मागताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मग्रूरी; हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान, ठाकरे संतापले

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का?. नवनीत राणांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं. किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकारमध्ये. यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा किती अधिकार आहे माहीत नाही. पण महाराजांच्या नावाने राजकारण करू नये, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहीट झाली आहे. गावागावात शहराशहरात खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोहोचली आहे. दुर्देव बघा, काँग्रेसचा माणूस अनिल वडपल्लीवार कोर्टात आडवा झालाय. तो कुणाचा कार्यकर्ता आहे. कुणाचा पोलिंग एजंट आहे. काँग्रेस आणि आघाडीने हायकोर्टातही याचिका केली, ती देखील फेटाळली. आता नागपूरला याचिका केली आहे. पण ही यशस्वी योजना आहे. विरोधक काहीही बोलले तरी लोकांना ही योजना पटली आहे, असं शिंदेंनी म्हटलं आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

CM Eknath ShindeEknath ShindeJode Maro Andolanmahavikas aghadimahavikas aghadi jode maro andolanmumbai newsजोडे मारो आंदोलनमहाविकास आघाडीमहाविकास आघाडी जोडे मारो आंदोलनमुंबई बातम्या
Comments (0)
Add Comment