Prakash Ambedkar On Shivaji Maharaj Statue Collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
मालवण येथील पुतळा प्रकरणी राजकारण सुरू झालं आहे. विरोधकांकडून आंदोलन केली जातं आहेत. दुसरीकडे या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे, पण राज्याच्या गृहमंत्र्यांनी अजून ही माफी मागितली नाही, त्यामुळे हा पुतळा पडला की पाडला असा सवाल आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. महायुतीचं सत्तेत येणं हे लोकांच्या उपयोगासाठी नाही, तर महाराष्ट्राची तिजोरी लूटने एवढ्यासाठीच आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
आंबेडकर पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या ऑडिटर जनरलचे गेल्या दहा वर्षाचे ऑडिट काय झाले हे अद्याप बाहेर आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यासंदर्भात सेंट्रल ऑडिटर जनरल जे समोर आले त्याची ही कुठेही चर्चा नाही. दुर्दैवानं असं म्हणावं लागेल, की जात व्यवस्था इथे खाण्यामध्ये आली. गडकरी हे एका विशेष क्लासचे असल्यामुळे त्यांची चर्चा कोणीच करत नाही, असंही आंबेडकर म्हणाले.
शिवरायांचा पुतळा पडला की पाडला? आंबेडकरांना वेगळीच शंका, थेट फडणवीसांचं नाव घेतलं
सत्ताधारी स्वतःच्या विरोधात आंदोलन करत आहेत?
मालवण येथील पुतळा प्रकरणी महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तर सत्ताधारी भाजप महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यावरून सत्ताधारी स्वतःच्या विरोधात आंदोलन करत आहेत का? की केवळ विरोधात आहोत हे दाखवण्यासाठी आंदोलन करत आहेत? कारण सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावर होते? असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.