Ajit Pawar VS Sharad Pawar : पवारांचा कोणता पैलवान बारामतीची गदा जिंकणार? असं आहे संपूर्ण गणित

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Sept 2024, 7:51 pm

maharashtra election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे अजित पवार अचानक जय पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवणार असेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर श्रावणातील शेवटच्या शनिवारी दरवर्षी होणारी कन्हेरी येथील मारुतीरायाची यात्रा यादृष्टीने चर्चेत आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
दीपक पडकर, बारामती : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा होती. आता पुन्हा एकदा बारामती विधानसभेची निवडणूक राज्यभर चर्चेत राहणार आहे. आणि या चर्चांना आतापासूनच सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे अजित पवार अचानक जय पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवणार असेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर श्रावणातील शेवटच्या शनिवारी दरवर्षी होणारी कन्हेरी येथील मारुतीरायाची यात्रा यादृष्टीने चर्चेत आली. या यात्रेच्या कुस्ती मैदानात एकाच वेळी जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर आले. अर्थात दोघेही समोरासमोर आले आणि दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. कन्हेरीकरांनी मात्र एकाच वेळी दोघांच्या हातात चांदीची गदा दिली. चांदीची गदा हातात घेताना दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.त्यामुळे आता खरोखरच जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यातच लढत झाली. तर तालुक्यातील राजकीय गदा कोण घेणार? रंगीत तालमीचा भाग नव्हता ना? अशी देखील चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

दोन्ही भावांनी घेतली गळाभेट

सख्खे चुलतभाऊ जय आणि युगेंद्र पवार यांनी कोणतीही कटुता नसल्याचे देखील उपस्थितांना दाखवून दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर जाण्याची आवश्यकता नाही. असा देखील संदेश यानिमित्ताने उपस्थितांना मिळाला. जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि ते एकत्र त्यांनी संवाद देखील साधला.
तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागतो? दादा गटातील सीनिअर नेत्याचं सूचक विधान अन् चर्चांना उधाण

युगेंद्र पवारांकडून जोरदार तयारी

सध्या युगेंद्र पवार हे तालुक्यातील गावागावात पोहोचले असून त्यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जय पवार देखील आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी आत्ता सध्या फिरत आहेत. मात्र अचानक जय पवारांना निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर या गदेचे दोघांचे एकत्र छायाचित्र येत्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत चांगले चर्चेत राहील असे दिसत आहे.

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

ajit pawarbaramati electionsBaramati TOPICjay pawarSharad PawarYugendra Pawarअजित पवारबारामती विधानसभाशरद पवार
Comments (0)
Add Comment