भाजपच्या बैठकीला दांडी, पवारांच्या भिडूंच्या क्लबला हजेरी; बडा नेता लवकरच हाती घेणार तुतारी?

Maharashtra Politics: भाजप नेते हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या दांडी मारणारे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते लवकरच कमळ सोडून हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. सध्या पाटील भाजप नेत्यांच्या संपर्कात कमी आणि शरद पवार गटाच्या नेत्यांच्या जास्त संपर्कात आहेत. त्यामुळे पाटील लवकरच पक्षांतर करतील अशी शक्यता आहे. तशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी आमदार, मंत्री हर्षवर्धन पाटील विधानसभा लढवण्यास उत्सुक आहेत. पण इंदापूरचे विद्यमान आमदार दत्ता भरणे अजित पवार गटाचे असल्यानं पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राजकीय कुरघोड्यांना कंटाळूनच पाटील भाजपमध्ये गेले. पण अजित पवारच भाजपसोबत आल्यानं सासूपाई वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली, अशी पाटील यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. तिकिटाबद्दल ठोस आश्वासन मिळत नसल्यानं ते शरद पवारांच्या संपर्कात आहेत.
तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागतो? दादा गटातील सीनिअर नेत्याचं सूचक विधान अन् चर्चांना उधाण
महायुतीत नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी मारली. त्याऐवजी त्यांनी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांच्या सॅटर्डे क्लबला हजेरी लावली. पाटील क्लबमध्ये सपत्नीक उपस्थित होते. शरद पवारांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे अशोक बापू पवार, विठ्ठल मणियार, अंकुश काकडे सॅटर्डे क्लबचे सदस्य आहेत. त्यामुळे या क्लबमध्ये पाटील यांनी लावलेली हजेरी निश्चितच भुवया उंचावणारी आहे.

भाजपच्या बैठकीला दांडी, पवारांच्या भिडूंच्या क्लबला हजेरी; बडा नेता लवकरच हाती घेणार तुतारी?

काही दिवसांपासून मला अनेकांचे फोन येत आहेत. पुढील एक-दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेण्याची शक्यता वाढली आहे. पाटील सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कार्यक्रमात दिसत आहेत. त्यामुळे ते लवकरच भाजपला रामराम करतील अशी चर्चा आहे. त्यांनी पक्ष सोडल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसू शकतो. पाटील १९९५ ते २०१४ अशी सलग १९ वर्षे इंदापूरचे आमदार राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत त्यांचं नातं विळ्याभोपळ्याचं राहिलं आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly electionMaharashtra Political NewsMaharashtra politicsVidhan Sabha Nivadnukअजित पवारदत्ता भरणेशरद पवारहर्षवर्धन पाटीलहर्षवर्धन पाटील शरद पवार भेट
Comments (0)
Add Comment