Jitendra Awhad On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक विधान केलं आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराजांनी सूरत लुटली नव्हती
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” आम्हाला कॉंग्रेसने इतिहासात शिकवली की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट केली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती. महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता. महाराजांनी सूरत कधी लुटलीच नव्हती, महाराज जणू काही सर्व सामान्य लोकांची लूट करायला गेले असा इतिहास कॉंग्रेसने आम्हाला शिकवला, त्यांना माफी मागायला सांगणार आहात का?” असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
फडणवीस साहेबांनी कहर केला
फडणवीसांच्या या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” फडणवीस साहेबांनी कहर केला आहे. ते म्हणताय की महाराजांनी फक्त छावणी लुटली सूरत लुटली नाही. माझं फडणवीसांना आव्हान आहे. बर्नियर नावाच्या इतिहासकाराने हे लिहून ठेवलं आहे. त्याकाळी सूरत हे व्यापाऱ्यांचे मोठे ठिकाण होते. त्यांच्या मनात लढाईच्या वेळी सुरतेतून मदत झाली हा राग होता. हा आमचा अभिमान आहे. आणि फडणवीस म्हणतात हे सगळं कॉंग्रेसने केलं आहे. इतिहासकारांना कॉंग्रेस पक्ष सांगायला गेला होता का? महाराज छावणी लुटायला गेले असं म्हणतात. परंतु हे चुकीचे आहे. महाराज स्वराज्य निर्माण करण्यासाठी जन्माला आले होते. तुम्ही महाराजांना लहान करण्याचा प्रयत्न करत आहात. तसेच त्यांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहात”.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेवरून माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे पुन्हा नव्याने वाद होण्याची शक्यता आहे.