shivaji maharaj statue : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणा नाका येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची महामार्गावरील पुलापेक्षा कमी असल्याने अप्रिय घटना घडू शकते. अशी भीती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक सुरू असते. भरणे नाका येथील पुलाच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. मात्र, आता महाराजांच्या पुतळ्याची एकतर उंची वाढवावी किंवा हा पुतळा येथून स्थलांतरित करून खेड नगरपरिषद हद्दीत लावावा. अशी मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले आहे.
पालकमंत्री उदय सामंतानी दिले आश्वासन
उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की. ”खेड येथील शिवसेना पदाधिकारी यांच्याजवळ चर्चा झाली आहे. लवकरच येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यास सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा खेड भरणे नाका येथे अपेक्षित आहे हे काम आम्ही नक्की करू”. असं आश्वासन सामंत यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेवरून माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच लवकरात लवकर नवीन पुतळा उभारण्यात येईल. असं आश्वासन देखील राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.