सोमवार २ सप्टेंबर २०२४,भारतीय सौर ११ भाद्रपद शके १९४६, श्रावण अमावास्या अहोरात्र, चंद्रनक्षत्र: मघा रात्री १२-१९ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
मघा नक्षत्र रात्री १२ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, शिव योग सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, चतुष्पद करण सायंकाळी ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर नाग करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२५
- सूर्यास्त: सायं. ६-५१
- चंद्रोदय: पहाटे ५-३७
- चंद्रास्त: सायं. ६-३७
- पूर्ण भरती: सकाळी ११-५६ पाण्याची उंची ४.२४ मीटर, रात्री ११-५९ पाण्याची उंची ३.६३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-१८ पाण्याची उंची ०.९१ मीटर, सायं. ५-५६ पाण्याची उंची १.३१ मीटर
- आजचे व्रत आणि सण : दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, पिठोरी अमावास्या, पितृकार्येषु अमावस्या, मातृदिन, पोळा, वृषभ पूजन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २७ मिनिटांपासून ते ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते ७ वाजून ३४ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपासून ते १ वाजून ३७ मिनिटांपर्यंत,
आजचा उपाय
शंभोशकंरावर पंचामृताने अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)