अजित पवारांकडून संत्रा पिकाची पाहाणी, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

Ajit Pawar in Amaravati : अजित पवार रविवारी अमरावतीमध्ये जनसन्मान यात्रेनिमित्त पोहोचले होते. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. तसंच शेतकऱ्यांच्या शेतात जात नुकसान झालेल्या संत्रा पिकाची पाहाणी केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
जयंत सोनोने, अमरावती : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक हिताचं रक्षण होऊन, त्या आर्थिक उन्नतीसाठी सक्षम होतील. महायुती सरकार लाडक्या बहिणीच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

गुलाबी रंगाच्या कारमधून एन्ट्री, जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी

जनसन्मान यात्रेनिमित्त वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात रविवारी मोर्शी येथे जाहीर सभा आणि रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी गुलाबी रंगाच्या कारमधून आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.
पुतळा हवेनं पडत नाही, नवख्या कलाकाराला काम देणं ही चूकच; रामदास आठवलेंकडून सरकारला घरचा आहेर
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये खोटे बोलून लोकांचे मत मिळवण्याचा प्रयत्न केला. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे कोणाच्याही हक्काला आमचा विरोध नाही. आम्ही आरक्षणाचे रक्षण करणारे आहोत. मात्र विरोधकांनी आमच्यावर खोटा आरोप लावत जनतेची दिशाभूल केल्याचेही त्यांनी म्हटले.
शिवरायांचा पुतळा पडला की पाडला? आंबेडकरांना वेगळीच शंका, थेट फडणवीसांचं नाव घेतलं

पावसामुळे संत्रा गळती, नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार

वरुड परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे संत्रा पिकाचं नुकसान झालं. या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी अजित पवारांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते उपस्थित होते.
Badlapur Case Update : पीडित मुलींनी ओळख परेडमध्ये आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं, काठी वाला दादा म्हणत…
वरुड परिसरात सततच्या पावसामुळे संत्रा पिकाचं नुकसान होत असल्याने याचा शेतकऱ्याला मोठा फटका बसतो आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी, यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना अजित पवारांनी दिल्या.

Amaravati News : अजित पवारांकडून संत्रा पिकाची पाहाणी, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

संत्रा पिकाची माहिती जाणून घेतली

पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाले असले, तरी शेतकऱ्यांचे जादा होत असलेले नुकसान पाहता दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करून ते तातडीने मंत्रालय स्तरावर सादर करण्यात यावेत. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

यावेळी अजित पवार यांनी संत्रा पिकाबाबत माहिती घेतली. संत्रा पिकासाठी येणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन याबाबत माहिती जाणून संत्र्याच्या असणाऱ्या जाती, चवीने उत्कृष्ट असणाऱ्या फळाची जाती, याबाबत माहिती घेतली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना जनावरांसाठी हिरवा चाऱ्यासाठी उत्पादन घेण्यासाठी देखील पुढे येण्याचे आवाहन केले.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

ajit pawar amaravati newsajit pawar inspected orange crop amaravatiajit pawar pink car amaravatiअजित पवारअजित पवार अमरावती जनसन्मान यात्राअजित पवार लाडकी बहीण योजनाअजित पवारांची अमरावतीमध्ये संत्रा पिकाची पाहाणीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment