खंद्या समर्थकाने सोडली फडणवीसांची साथ, महाराष्ट्रातील जनतेचा माजी मुख्यमंत्र्यांना हात

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Today Top 10 Headlines in Marathi: आज मराठीतील टॉप 10 हेडलाईन्स | Maharashtra Times
१. भाजपाचा गड विदर्भातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का, माजी आमदार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत, काँग्रेसमध्ये घरवापसीचे संकेत, इथे क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

२. राज्यातील जनतेचा मूड सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांच्या सर्वेक्षणातून उघड, सर्व्हेत सहभागी २३ टक्के जणांची देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती, दुसऱ्या स्थानावर २१ टक्क्यांसह शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तिसऱ्या नंबरवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १८ टक्के मतांसह

३. येत्या दहा दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय, बैठकीत काही मुद्यांवर एकमत, तर काही मुद्दे बाकी, कुठली आकडेवारी ठरली नाही, बैठकीत जागांच्या वाटपात विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य, जागांचा आग्रह कोणत्याही पक्षाने धरलेला नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

४. गणपती आगमन मिरवणुका आणि खरेदीसाठी नागरिकांनी रविवारी केलेल्या गर्दीमध्ये बेस्टची बस शिरली, लालबाग राजा येथील गरम खाडा मैदानासमोर प्रकार, बसमधील दारूड्या प्रवाशाने चालकासोबत हुज्जत घालत स्टेअरिंग जबरदस्तीने फिरवल्याने अपघात, अपघातामध्ये आठ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर, अनेक वाहनांचेही नुकसान

५. मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या दरांत घसरण सुरुच, बाजार समितीत टोमॅटोला प्रतिकिलो दोन रुपयांपासून ते दहा रुपयांचा दर, सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा, तरी उत्पादक शेतकरी चिंतेत अडकला, टोमॅटो आणि पालेभाज्या स्वस्त, तर वांगी, दोडका, शिमला मिरचीच्या दरांत वाढ

६. कोलकाता येथील डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणानंतर ‘मेलडी क्वीन’ श्रेया घोषालचा मोठा, कठीण काळात संगीत कॉन्सर्ट करणं मनाला पटत नाही, मैफिलीची तारीख श्रेयाने ढकलली पुढे

७. पाकिस्तानमधील नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मॉक इंटरव्ह्यू असल्याची चर्चा, गुप्त माहितीसाठी कतरिनासोबत रिलेशनशीपमध्ये राहशील का? उमेदवाराच्या उत्तराची चर्चा, इथे क्लिक करुन वाचा सविस्तर

८. भारतीय शेअर मार्केटसाठी मागील आठवडा सकारात्मक, देशांतर्गत बाजारात हिरवळ, सप्टेंबर महिन्यातही तेजीची शक्यता, सोमवारी शेअर मार्केटची हिरव्या रंगात सुरुवात, सेन्सेक्स-निफ्टी पॉझिटिव्ह ट्रेडिंग, जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडनंतर नवीन उच्चांकाची नोंद

९. माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांच्यावर निशाणा, ज्याला हीन दर्जाची वागणूक दिलीत त्याला जग वंदन करतं, योगराज यांचा प्रहार

१०. भारताचा स्टार ॲथलीट निषाद कुमारला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी प्रकारात रौप्य पदक, भारताला सातवे पदक, निषाद कुमारला 2.04 मीटर उडी मारून दुसरे स्थान, तीन वेळा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता युनायटेड स्टेट्सच्या रॉड्रिक टाउनसेंड-रॉबर्ट्सने 2.08 मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Breaking Newstoday breaking newstoday headlinestop 10 headlinestop 10 headlines newstop 10 latest newsआजच्या ठळक बातम्याआजच्या बातम्याटॉप 10 ताज्या बातम्याठळक बातम्या
Comments (0)
Add Comment