मला माफ करा…मुलांना सांभाळा… भावनिक चिठ्ठी लिहली अन् महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं, सोलापुरात हळहळ

Solapur Suicide Case: छत्रपती संभाजीनगरनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये एका विवाहित महिला डॉक्टरने आपले आयुष्य संपवले आहे. राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे. ‘मुलांना सांभाळा… मला माफ करा…’ अशा मजकुराची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे.

Lipi
सोलापूर : छत्रपती संभाजीनगरनंतर आतासोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये एका विवाहित महिला डॉक्टरने आपले आयुष्य संपवले आहे. राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे. ‘मुलांना सांभाळा… मला माफ करा…’ अशा मजकुराची चिठ्ठी लिहून या महिला डॉक्टराने आत्महत्या केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील डॉ. आंबेडकर चौक येथील मोहोळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. रश्मी संतोष बिराजदार यांनी अज्ञात कारणावरून घरात पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करताना चिठ्ठी सापडली आहे. डॉ. रश्मी बिराजदार यांनी लिहिलेले मजकूर वाचून सर्वचजण गहिवरले होते. डॉ. रश्मी यांच्या आत्महत्येने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात आत्महत्येची तिसरी घटना

सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात आत्महत्येचे सत्र वाढत चालले आहे. गेल्या – तीन ते चार महिन्यांतील महिला डॉक्टरच्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी सांगोला, पेनूर येथील महिला डॉक्टरांनी आत्महत्या केल्या आहेत. या घटनांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Doctor Ends Life: डियर अहो, बाय… चार पानी पत्रात मन सुन्न करणारी कहाणी अन् डॉक्टर महिलेने आयुष्य संपवलं

मला माफ करा… घटनास्थळी सापडली चिट्ठी

मोहोळ पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. रश्मी बिराजदार यांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली. ‘मुलांना सांभाळा, मला माफ करा..’ अशा मजकूर चिठ्ठीत असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. रश्मी बिराजदार बीएएमएसची पदवी प्राप्त डॉक्टर आहेत. त्या गेल्या दहा वर्षांपासून डॉ. रश्मी बिराजदार या रुग्णांची सेवा करत होत्या. सध्या त्या मोहोळ तालुक्यातील शहराच्या ठिकाणी नव्यानेच सुरु झालेल्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात काम करत होत्या. त्यांचे पती संतोष बिराजदार यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. निवासस्थानाच्या इमारतीमध्येच हे रुग्णालय असल्याची माहिती समजते.

सुखी संसाराला ग्रहण; आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट

रश्मी बिराजदार या आपल्या पती, एक मुलगा व मुलीसह आंबेडकर चौक मोहोळ येथे वास्तव्यास होत्या. त्यांनी रविवारी राहत्या घरात गळफास घेतला. रुग्णालयातील परिचारिकेने हे पाहताच संतोष बिराजदार यांना माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने मोहोळ ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची खबर पती संतोष बिराजदार (वय ३६) यांनी मोहोळ पोलिसांत दिली आहे. सुखी संसाराला ग्रहण लागल्याने मोहोळ मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मात्र रश्मी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तर मोहोळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

lady doctor ends lifenote for husbandshocking suicide noteSolapur suicide caseधक्कादायक सुसाईड नोटनवऱ्याला चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलेमहिला डॉक्टरची आत्महत्यासोलापूर मधील आत्महत्यासोलापूरात हळहळ
Comments (0)
Add Comment