Weekly Horoscope 2 To 8 september 2024 : सप्टेंबर महिन्याची सुरुवात पिठोरी अमावस्या, बैलपोळा आणि पाचवा श्रावणी सोमवार याने होत आहे. तसेच या आठवड्यात गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होईल तर काहींना नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. पैशांचे व्यवस्थापन करा. जोडीदाराशी संवाद कमी होईल, त्यामुळे गैरसमज वाढू शकतात. वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
सप्टेंबर महिन्याची सुरुवात पिठोरी अमावस्या, बैलपोळा आणि पाचवा श्रावणी सोमवार याने होत आहे. तसेच या आठवड्यात गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होईल तर काहींना नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. पैशांचे व्यवस्थापन करा. जोडीदाराशी संवाद कमी होईल, त्यामुळे गैरसमज वाढू शकतात. वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल. ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीने गैरसमज लवकरच दूर होतील. प्रेमसंबंधात तीव्रता राहिल. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. कामात अडथळे निर्माण करु शकतात. तुम्ही केलेल प्रयत्न आणि मेहनत याकडे वरिष्ठ दुर्लक्ष होईल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने तुम्ही थोडे उदास राहाल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
मेष – रागावर नियंत्रण ठेवा
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अधिक व्यस्त असणार आहे. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास खूप थकवणारा असेल. अपेक्षेपेक्षा कमी फल मिळतील. जुन्या आजारांपासून तुमची सुटका होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. आरोग्यासोबत नातेसंबंधात अधिक लक्ष द्यावे लागेल. प्रवासादरम्यान खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. काही चुकीच्या गोष्टींमुळे राग अनावर होईल. विरोधक या काळात अधिक सक्रीय होतील. मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेताना हितचिंतकांचे मत घ्या. पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. पैशांचे व्यवस्थापन करा. जोडीदाराशी संवाद कमी होईल, त्यामुळे गैरसमज वाढू शकतात. वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल.
भाग्यशाली रंग: गुलाबी
भाग्यशाली अंक: 12
वृषभ – नोकरीत बदल होतील
या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्य देईल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. सुरुवातीला करिअर किंवा व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना पूर्ण होतील. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन संधी मिळेल. कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. व्यक्तीच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. इच्छित ठिकाणी बदली झाल्याने आनंदाचे वातावरण राहिल. काही विषयावर मतभेद होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीने गैरसमज लवकरच दूर होतील. प्रेमसंबंधात तीव्रता राहिल. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
भाग्यशाली रंग : सोनेरी
भाग्यशाली अंक : 5
मिथुन – कामाचा ताण वाढेल
या आठवड्यात सहकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळणार नाही. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमचा अपमान होईल. कामात अडथळे निर्माण करु शकतात. तुम्ही केलेल प्रयत्न आणि मेहनत याकडे वरिष्ठ दुर्लक्ष होईल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने तुम्ही थोडे उदास राहाल. तुमच्या खिशातील पैशापेक्षा जास्त खर्च घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीच्या वस्तू खरेदी कराल. त्यामुळे बजेट बिघडेल. व्यवसायाशी संबंधित व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. विचारपूर्वक विचार करुनच पैसे योजनेत गुंतवणूक करा. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. जोडीदार कठीण काळात मदत करेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
भाग्यशाली रंग : काळा
भाग्यशाली अंक : 6
कर्क – उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील
कर्क राशीसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. हिंतचिंतकाच्या सहकार्याने नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना चांगली बातमी मिळेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय शुभ ठरेल. परदेशात करिअर करणाऱ्यांना प्रयत्नात मोठे यश मिळेल. एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर आधी बोलून घ्या. प्रेमसंबंध घट्ट होतील.
भाग्यशाली रंग: निळा
भाग्यशाली अंक: 7
सिंह – वैवाहिक जीवन आनंदी राहील
सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुमची ताकद सिद्ध होईल. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. यशाच्या उत्साहात अहंकार मनात तयार होईल. या काळात तुम्हाला उतावीळ आणि भावनिक होण्याचे टाळावे लागेल. व्यसायात आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा शुभ राहिल. प्रिय जोडीदारासोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
भाग्यशाली रंग: सफेद
भाग्यशाली अंक: 8
कन्या – व्यवसायात नवीन संधी
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास शुभ आणि लाभदायक ठरेल. प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. संपत्ती वाढ होईल. नोकरदार महिलांसाठी हा आठवडा शुभ असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. जवळच्या व्यक्तीच्या मदतीने नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंधातील अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
भाग्यशाली रंग: लाल
भाग्यशाली अंक: 2
तुळ – कामात अडचणी येतील
तुळ राशीसाठी हा आठवडा थोडा व्यस्त असेल. मालमत्तेशी संबंधित वाद मिटवण्याचा प्रयत्न कराल. तुमचे विरोधक काम बिघडवण्याचा कट रचतील. हितचिंतकांच्या मदतीने काम करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील रस कमी होईल. नवीन रोजगारासाठी वाट पाहावी लागेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळाच पैशांचा व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हिंतचिंतकांचा सल्ला घ्या
भाग्यशाली रंग: पिवळा
भाग्यशाली अंक: 4
वृश्चिक – मोठी जबाबदारी मिळेल
या आठवड्यात तुम्हाला बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या सहाय्याने सर्व कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात केलेले प्रयत्न अपेक्षित यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी काही विशेष कामासाठी जबाबदारी मिळेल. राजकारणातील लोकांसाठी हा आठवडा शुभ असेल. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल त्यांच्या अनेक इच्छा या आठवड्यात पूर्ण होतील. जवळच्या मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा आजारांना बळी पडू शकता. प्रेमसंबंधात हा आठवडा अनुकूल असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
भाग्यशाली रंग: जांभळा
भाग्यशाली अंक: 1
धनु – आर्थिक बजेट बिघडेल
धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात वेळ आणि पैसा दोन्ही सांभाळावे लागेल. कोणतेही महत्त्वाचे काम पुढे ढकलू नका, अन्यथा काम बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी विरोधक तुम्हाला अडकवू शकतात. तुमच्या योजना इतरांसमोर उघड करणे टाळा. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल. करिअर आणि व्यवसायात नुकसान टाळावे. तुमच्या समोर अचानक मोठा खर्च आल्याने बजेट बिघडू शकतो. आरोग्याबाबत चिंतेत राहाल. प्रेम संबंध सुधारण्यासाठी लव्ह पार्टनरच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका. प्रेमसंबंधांत उधळपट्टी टाळा, अन्यथा तुम्हाला सामाजिक कलंकाला सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
भाग्यशाली रंग: हिरवा
भाग्यशाली अंक: 3
मकर – परिश्रम करावे लागेल
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहिल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागेल. परिश्रम आणि प्रयत्नांना दुर्लक्षित केले जाऊ शकते. नोकरदार महिलांना काम आणि घर सांभाळ्यात अडचणी येतील. जमीन आणि इमारती संबंधित वादामुळे अडचणी वाढतील. समस्यांचे निराकरण स्वत: करावे लागेल. नशिबावर अवलंबून न राहाता योग्य दिशेने काम करा. करिअर आणि व्यवसायात प्रयत्न केल्याने यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विचारपूर्वक पुढे जावे लागेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल.
भाग्यशाली रंग: आसमानी
भाग्यशाली अंक: 9
कुंभ – व्यवसायात नुकसान
कुंभ राशीसाठी या आठवड्यात बुद्धी आणि विवेकाचा योग्य वापर करावा लागेल. त्यानंतरच करिअर आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित मोठा निर्णय घेताना जवळच्या मित्राचा सल्ला घ्या. जवळच्या फायद्याने खूप मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला काम करताना अहंकार मागे ठेवावा लागेल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावे लागू शकते. संधीचा पुरेपूर फायदा घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा लकी असेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. प्रेमाचे रुपातंर लग्नात होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
भाग्यशाली रंग: तपकिरी
भाग्यशाली अंक: 11
मीन – कामात नुकसान
मीन राशीच्या लोकांना कोणतेही मोठे पाऊल उचलताना विचार करावा लागेल. घाईत कोणतेही काम करणे टाळा, नुकसान होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. नवीन नोकरीसाठी थोडी अजून वाट पाहावी लागेल. कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. मुलांशी संबंधित चिंता मानसिक त्रासाचे प्रमुख कारण बनेल. प्रेमात घाईने निर्णय घेणे टाळा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. जोडीदारासोबत लहान किंवा लांबचा प्रवास संभवतो.
भाग्यशाली रंग: जांभळा
भाग्यशाली अंक: 15