‘त्या’ महिलांना लाडकी बहीण योजनेच्या ३ हजार रुपयांना मुकावे लागणार, अदिती तटकरेंची माहिती

Aditi Tatkare on Majhi Ladki Bahin : माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत नोंदणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती. ही नाव नोंदणी यापुढेही कायम राहणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अदिती तटकरे
गडचिरोली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी केली आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ एकत्रित जमा झाला आहे. मात्र ही तारीख चुकवणाऱ्या महिलांना तीन हजार रुपयांना मुकावे लागणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली.

कोणत्या महिलांना लाभ नाही?

एक सप्टेंबरनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून लाभ मिळणार आहे, असंही अदिती तटकरे यांनी सांगितलं.

माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत नोंदणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती. ही नाव नोंदणी यापुढेही कायम राहणार आहे. ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्या महिन्यापासून संबंधित महिलेला लाभ मिळेल, असं अदिती तटकरेंनी सांगितलं.
Ajit Pawar on Ladki Bahin : ताई, ऊस किती जातो तुमचा? अजितदादांचा सवाल, ‘लाडकी बहीण’ची लाभार्थी म्हणाली ५००-६०० टन, सभागृहात हशा

किती जणींचे अर्ज?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळात आहे. आतापर्यंत दोन कोटी ४० लाखांपर्यंत अर्ज करण्यात आले असून, राज्यातील महिला वर्ग योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी सरकारची धारणा आहे.

‘त्या’ महिलांना लाडकी बहीण योजनेच्या ३ हजार रुपयांना मुकावे लागणार, अदिती तटकरेंची माहिती

दोन कोटी ४० लाख महिलांचा अर्ज

राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने जुलै महिन्यात ही योजना सुरु केली. १७ ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये याप्रमाणे दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली. राज्यात आतापर्यंत दोन कोटी ४० लाख महिलांनी अर्ज केला. त्यापैकी राज्यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित ४० ते ४२ लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाइल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरु आहे.
Supreme Court on Ladki Bahin : लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का? सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला खडसावलं

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज

राज्यात आतापर्यंत दोन कोटी ४० लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. यामध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज करण्यात आले. नारीशक्ती अॅपद्वारे पूर्वी नऊ लाख ७४ हजार, तर ऑगस्ट महिन्यात वेबसाइटद्वारे आठ लाख ७० हजार असे १८ लाख ५० हजार ५४७ अर्ज जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६९ हजार ८७५ इतक्या अर्जांची छाननी करणे अद्याप बाकी आहे.

किती जणींना दोन महिन्यांची रक्कम जमा?

सुमारे १४ लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे उर्वरित ज्या महिलांचे आधार जोडणीचे काम अपूर्ण आहे, त्या महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झाल्यानंतर योजनेंतर्गत रक्कम जमा होईल, असेही महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Aditi Tatkare on Ladki BahinMaharashtra Government SchemesMaharashtra Majhi Ladki Bahin Schemeअदिती तटकरेएकनाथ शिंदे सरकार योजनामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासरकारी योजना
Comments (0)
Add Comment