Ajit Pawar On Violence Against Women: बारामती येथे जनसन्मान यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा महिला अत्याचारांच्या घटनाबाबत अशा नराधमांना फाशीची शिक्षा होण्याच्या आधीच बंदोबस्त करा अशा कठोर शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची आज बारामतीत जनसमान यात्रा आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे, खासदार सुनेत्रा पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवारांचे पुत्र जय पवार पार्थ पवार ही यावेळी उपस्थित होते.
दादांनी पोलिसांना ‘टाईट’ केले आहे
Violence Against Women: ‘कट कट कट’ डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवार पुन्हा बोलले
पुढे पवार म्हणाले की,समाजातील महिला, मुलींना कोणी त्रास देत असेल तो कितीही मोठ्या बापाचा असो. अजिबात त्याचा ‘लाड’ चालणार नाही. पालकांनो तुम्हीही आपल्या मुलांना नीट समजवा. महिला मुलींची छेड काढू नका. दादांनी पोलिसांना ‘टाईट’ केले आहे.टाईट केल आहे म्हणजे. महिला मुलींची कोणी छेड काढत असेल तर तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असू द्या.. त्याला सोडायचं नाही कायदा सर्वांना सारखा..असं अजित पवार यावेळी म्हणाले.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबद्दल अजित पवारांनी अशा पद्धतीने बोलण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी बदलापूर येथील शाळेत झालेल्या घटनेनंतर जळगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी अशा विकृत व्यक्तींचे सामानच काढून टाकले पाहिजे असे म्हटले होते.