Maratha Reservation : विरोधकांच्या भूमिकेवरून मराठा समाजबांधवांत कुजबूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर वाढल्या गावगाड्यात चर्चा
विरोधकांकडून राज्य सरकारला; विशेषत: फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. राजकारणासाठी आरक्षणाचा मुद्दा वापरला जात असताना विरोधीपक्षातील प्रमुख नेत्यांकडून याविषयी भूमिका मांडली जात नसल्याने संभ्रम वाढला आहे. फडणवीस यांच्या आव्हानानंतर आता मराठा समाजातूनही विरोधकांनी आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांची नेमकी भूमिका मांडावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागली आहे. गावांमधील कट्ट्यांवरही ही चर्चा होत आहे.
मराठा समाजात विरोधकांच्या भूमिकेवर चर्चा वाढू लागताच फडणवीस यांनी, ‘विरोधकांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मान्य असल्यास त्यांनी मराठा समाजबांधवांना लेखी द्यावे असे आव्हान दिले आहे.
Maratha Reservation : फडणवीसांचे ‘ते’ आव्हान महाविकास आघाडीला महागात पडणार? मराठा समाजात रंगली चर्चा
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. मात्र विरोधी पक्षनेते या बैठकीला गैरहजर राहिले. या बैठकीत विरोधकांना मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका मांडावी लागणार होती. हे त्यांना माहिती असल्याने बैठकीवर बहिष्कार टाकला. यापैकी कुणीही मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार नाही’, असा दावा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत केला आहे.‘देवेंद्र फडणवीस यांचे आमदार पाडणार’ या विधनाचा बोलविता धनी कोण आहे, हे स्पष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हे माहिती आहे. कुठल्या गोष्टीसाठी कोण जबाबदार आहे हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरक्षण राजकारणाचा डाव मराठा समाजबांधव उधळून लावतील’, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या टीकेच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात विरोधी गटातील नेते मराठा आरक्षणावर नेमकी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागले आहे.