दहीहंडीच्या बक्षिसातून पिकनिकचा बेत, फार्म हाऊसवर रात्रभर एन्जॉय, घरी परतताना अनर्थ

Thane Accident News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्याच आठवड्यात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरा करून विविध राजकीय पक्षाच्यावतीने लाखोंची रक्कम दहीहंडी फोडणाऱ्या पथकांना बक्षीस म्हणून जाहीर करून दिली होती.

हायलाइट्स:

  • दहीहंडीच्या बक्षिसातून पिकनिकचा बेत
  • फार्म हाऊसवर रात्रभर एन्जॉय
  • घरी परतताना अनर्थ भीषण अपघात
Lipi
ठाणे अपघात
ठाणे (भिवंडी) : दहीहंडी फोडल्यानंतर बक्षीस रूपात मिळालेल्या रकमेतून पिकनिकसाठी गोविदांचं पथक गेलं होते. त्यानंतर पिकनिक करून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेत भीषण अपघात होऊन दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबई नाशिक महामार्गावरील शांग्रीला रिसॉर्टनजीक असलेल्या वडपे गावाच्या हद्दीत घडली आहे.या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आशिष लालजीत वर्मा (वय १५) आणि खुर्शीद आलम उर्फ अयान नाजीर अली अन्सारी (वय १८) असं भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर राहुल हिरालाल प्रजापती (वय २१) असं अपघातात जखमी झालेल्याचं नाव आहे.
Kolhapur Politics : कोल्हापुरात ट्रिपल धमाका, घाटगेंनी भाजप सोडला, तर दोन बडे नेतेही ‘घड्याळ’ काढण्याच्या तयारीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्याच आठवड्यात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरा करून विविध राजकीय पक्षाच्यावतीने लाखोंची रक्कम दहीहंडी फोडणाऱ्या पथकांना बक्षीस म्हणून जाहीर करून दिली होती. त्यातच मृतक आशिष आणि खुर्शीद आलम हे दोघेही भिवंडी शहरातील एका गोविंदा पथकात दहिहंडी फोडण्यासाठी सामील होते. पथकातील गोविंदानी दहीहंडी फोडल्यानंतर बक्षीस रूपात मिळालेल्या रकमेतून पिकनिक करण्याचे ठरवले होते. त्यानुसार १ सप्टेंबर म्हणजे रविवारी जाण्याचा त्यांनी बेत आखला होता. पिकनिकसाठी शहापूर तालुक्यातील वाशिंद गावाच्या हद्दीत असलेल्या शंकर तावडे यांच्या फार्म हाऊसवर रविवारी सायंकाळच्या सुमाराला गोविंदा पथकातील २० ते २५ आपआपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनाने गेले होते.

त्यानंतर पिकनिक करून घरी परतताना तीन मित्र एमएच ०४ एलव्हाय ८३७८ या ॲक्टिव्हा दुचाकीने काल सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुंबई – नाशिक महामार्गाने घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ते वडपे हद्दीत आले असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचालक रस्त्याच्या कडेला पडला. तर पाठीमागील दोघेही रस्त्याच्या मधोमध पडल्याने त्यांना कंटेनर चालकाने चिरडून पसार झाला. सुदैवाने या अपघातात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र दोघांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ST Bus Strike: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर लालपरीला ब्रेक, ST कर्मचारी पुन्हा संपावर, कुठे ST सुरु कुठे बंद?

दरम्यान, दुचाकीवरील तिघांनाही उपचारासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मृतक दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर राहुल हा किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी राहुलच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रकचालकाच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६, २८१, १२५, (ए), १२५(बी) मो. का. कलम १८४, १८७ प्रमाणे काल सोमवारी सकाळच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

तर घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला असून पोलीस पथक घटनास्थळ आणि मुंबई – नाशिक महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार चालकाचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मृतक तरुणांचा पिकनिक करताना नाचत दहीहंडीचा थर लावताना शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर या घटनेमुळे भिवंडीतील गोविंदा पथकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

accident while returning from a picnicthane accident newstwo wheeler accidentअपघात बातम्याठाणे अपघातवडपे पिकनिकहून परतताना अपघातवाशिंद दुचाकी अपघात
Comments (0)
Add Comment