Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी असा प्रश्न विचारत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठा फलक लावण्यात आला आहे. फलकात मनोज जरांगे पाटील यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
मनोज जरांगे पाटलांना मराठा नेत्याने दिला आठ दिवसांचा अल्टिमेटम
बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? असा सवाल अण्णासाहेब शिंदे यांनी उपस्थित केला आहे. अण्णासाहेब शिंदें इतरही प्रश्न उपस्थित केले आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी आठ दिवसात याचे उत्तर न दिल्यास मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा बार्शी मधील अण्णासाहेब शिंदें या मराठा नेत्याने दिला आहे.
अण्णासाहेब शिंदें यांचे डिजिटल फलकात प्रश्न
बार्शी मधील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा. देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? असे प्रश्न अण्णासाहेब शिंदें यांनी उपस्थित केले आहेत.
Maratha Reservation: सरकारला इशारा देणाऱ्या मनोज जरांगेंना मराठा नेत्यांकडून ८ दिवसाचा ‘अल्टिमेटम’; राज्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या
अण्णासाहेब शिंदेंच्या प्रश्नामुळे बार्शीतील मराठा समाजाच्या भुवया उंचावल्या
अण्णासाहेब शिंदें यांनी डिजिटल फलका मार्फत मनोज जरांगे पाटील यांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या आठ दिवसात या प्रश्नांचे निरसन न केल्यास बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णासाहेब शिंदे यांनी केला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात तसेच या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.