Ajit Pawar : कोल्हापूरकरांना अजित पवारांचं मोठं गिफ्ट, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणार

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 11:12 pm

kolhapur cricket stadium : कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. करवीर तालुक्यातील विकासवाडी गावच्या परिसरात हे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक मंडळाच्या ताब्यात असलेली 421 हेक्टर जागेपैकी 12 हेक्टर जागा क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. करवीर तालुक्यातील विकासवाडी गावच्या परिसरात हे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक मंडळाच्या ताब्यात असलेली 421 हेक्टर जागेपैकी 12 हेक्टर जागा क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर स्टेडिअम उभारण्यासाठी येणारा खर्च हा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार आहे. तसेच क्रीडा विभागाने त्यांच्याशी करार करावा आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

क्रीडा क्षेत्राला वलय प्राप्त होतंय

अजित पवार म्हणाले की, ” ग्रामीण भागामध्ये क्रीडा क्षेत्राला मोठं वलय प्राप्त होत आहे. राज्यासह देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. ग्रामीण भगत क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली आहे. क्रिकेट खेळाडूंच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर पुढील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी चांगले स्टेडियम गरजेचे आहे”. असं अजित पवार म्हणाले आहेत.
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप बेकायदेशीर, औद्योगिक न्यायालयाने ओढले ताशोरे

कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का

समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला राम राम ठोकला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे. आज शरद पवार यांच्या नेतृत्वात कागलमधील गैबी चौकात समरजितसिंह यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे. तर अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे टेन्शन वाढले
आहे.

जयंत पाटलांची फटकेबाजी

जयंत पाटील यांनी भाषणाला सुरवात करताच मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ”सगळ्यांची घरं कुठे आहेत हे मला माहित आहे. काही गोष्टी घडत नसतात तर घडवाव्या लागतात. आज समरजित राजेंनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. आजच्या प्रवेशाला शरद पवार आहेत इतकाच संदेश मतदारसंघासाठी महत्त्वाचा आहे. विकासासाठी राजेंनी तुतारी हातात घेतली. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. महाराष्ट्रामधील जनता हुशार आहे. पवार कसं वातावरण बदलतात हे पाहून आमचे विरोधक बुचकळ्यात पडले असतील”.

अजित पवारांना जयंत पाटलांचा टोला

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अजित पवारांना टोला लगावला आहे ते म्हणाले की, ”शरद पवार वस्तादांचे वस्ताद आहेत. ते डाव राखून ठेवतात. मी माझ्या जाणाऱ्या सहकाऱ्यांना सांगत होतो शरद पवारांना डावलून जाऊ नका मोठं लफड होईल. मात्र, ते सरकारमध्ये जाऊन बसले. त्यांना सरकार मध्ये गेल्याने संरक्षण मिळेल त्यांना वाटल असेल. त्यामुळे सगळेच निघून गेले आम्ही काही जण राहिलो”.

दरम्यान, अजित पवार यांनी हा निर्णय घेऊन कोल्हापूरच्या जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

cricket stadium in kolhapurkolhapur latest newsKolhapur newsअजित पवारअजित पवार न्यूजकोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमकोल्हापूर न्यूजकोल्हापूर बातम्याकोल्हापूरकरांना अजित पवारांचं मोठं गिफ्ट
Comments (0)
Add Comment