घाटगेंच्या हाती तुतारी, शरद पवारांनी डाव टाकला; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एकाचवेळी धक्का

Samarjeetsinh Ghatge Joins NCP SP: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी भाजप, अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कोल्हापूर: लोकसभेत ८० टक्के स्ट्राईक रेट राखणाऱ्या शरद पवारांनी कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे. समरजीत घाटगेंच्या हाती तुतारी देत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव टाकला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या घाटगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गैबी चौकातील सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती आहे. घाटगेंच्या पक्षप्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

२००९ मध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत सदाशिवराव मंडलिक यांच्या सभेला जशी गर्दी होती, तशीच गर्दी आज झाल्याचं घाटगे त्यांच्या भाषणात म्हणाले. शरद पवारांच्या पक्षात येत्या काही दिवसांत आणखी अनेकांचे प्रवेश होतील. पण माझ्या पक्षप्रवेशावेळी पवार साहेब स्वत: उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला हा मान, सन्मान कागलच्या जनतेमुळे मिळाला आहे, अशा भावना घाटगेंनी बोलून दाखवल्या.
Uddhav Thackeray: ठाकरेसेना स्वबळ आजमवणार; २० जागांवर एकला चलो रे; विधानसभेसाठी शड्डू ठोकला
गैबी चौकातच सभा घायची हा निर्णय शरद पवारांनी घेतला. गेल्या काही वर्षात गैबी चौक एकाच व्यक्तीच्या सभेसाठी आहे असं वाटायचं. पण या ठिकाणी ओरिजनल वस्तादच सभा घेऊ शकतो, असं घाटगे म्हणाले. मागील ८ वर्षे एका पक्षासोबत प्रामाणिकपणे काम केलं. मात्र आता शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करणार. कागलचा पुरोगामी विचार पुढे नेणार, अशी ग्वाही घाटगेंनी दिली.

घाटगेंच्या हाती तुतारी, शरद पवारांनी डाव टाकला; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एकाचवेळी धक्का

अनेक जण मला विचारतात, तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जात आहात. पण महायुतीकडे राज्यात, केंद्रात सत्ता आहे. तुमच्याकडे काय आहे? माझं त्यांना उत्तर आहे, माझ्याकडे शरद पवार आहेत, असं घाटगे म्हणाले. ‘जयंत पाटील साहेब, गेल्या निवडणुकीत तुम्हीच शेवटच्या टप्प्यात त्यांच्यासाठी (हसन मुश्रीफ) माझा कार्यक्रम केला होता. तुम्हीच म्हणता टप्प्यात आले की कार्यक्रम करायचा. गेल्यावेळी चूक झाली. ती आता सुधारायची आहे. आता मी तुमच्यासोबत आहे’, अशा शब्दांत घाटगेंनी कागलमधून लढण्याचे संकेत दिले. हसन मुश्रीफ १९९९ पासून कागलचे आमदार आहेत.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

ajit pawarHasan MushrifMaharashtra politicsSamarjeetsinh Ghatgesamarjeetsinh ghatge joins ncpभाजपला धक्कामहाराष्ट्र राजकीय बातम्याशरद पवारांचा भाजपला झटकासमरजीतसिंह घाटगेसमरजीतसिंह घाटगे शरद पवार गटात
Comments (0)
Add Comment