ST Strike: एसटी संप कायम, आणखी १०० आगारांतील कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे आज तीव्रता वाढणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह इतर मागण्या सरकार दरबारी प्रलंबित असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. ३) बेमुदत संप सुरू केला. त्यामुळे एसटी बसेसची चाके थांबली असून, ऐन सणासुदीत प्रवाशांचे मोठे हाल झाले. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर कर्मचारी ठाम असून, सरकारने कर्मचारी संघटनेला बुधवारी (दि. ४) दुपारी चर्चेसाठी पाचारण केले आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत तरी संप मिटण्याची शक्यता नसल्याने प्रवाशांची गैरसोय अटळ आहे.