Maha Vikas Aghadi: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल यावर शरद पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले. निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळाच्या आधारावर याबाबत निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा आताच विचार करण्याचे काहीही कारण नाही. याबाबतचा निर्णय निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळावर घेतला जाईल, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. यासाठी पवारांनी १९७७ सालचे उदाहरण दिले. ७७ साली निवडणुकीच्या निकालानंतर सर्व एकत्र आले होते आणि निवडणुकीनंतर मोरारजींचे नाव समोर आले. आमचा उद्देश स्थिर सरकार देण्याचा आहे, असे देखील ते म्हणाले.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे घोडे कुठे अडकले आहे? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, घोडे अजिबात अडकले नाही. त्याचा आता विचार करण्याची काही गरज नाही. अनेक वेळा नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा निर्णय निवडणूक झाल्यावर संख्याबळाच्या आधारावर ठरवायचे असते.आज कशाचा काही पत्ता नाही, त्यामुळे त्याचा आताच विचार करण्याची गरज नाही. तर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत पवार हे बरोबर बोलले, असे नाना पटोले म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या मागणीच्या आधीच या विषयावर बोलून झाले आहे, असे ही नाना म्हणाले. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री होण्यासाठी कोणी लढत नाही.
जागावाटपाची तारीख सांगितली
महाविकास आघाडीतील जागावाटपाची तारीख शरद पवार यांनी यावेळी सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशा तिघांच्यात ७,८ आणि ९ सप्टेंबर रोजी जागा वाटपाच्या चर्चेची प्रक्रिया सुरू होईले असे त्यांनी सांगितले. मी त्या चर्चे नाही, आमचे बाकीचे सहकारी त्यात असतील असे ही शरद पवारांनी स्पष्ट केले.
Assembly Elections: निकालानंतर या आधारावर ठरवला जाईल मुख्यमंत्री, शरद पवारांचे मोठे वक्तव्य; जागावाटपाबाबत व्यक्त केली इच्छा
व्यक्त केली इच्छा
जागा वाटपाच्या प्रक्रियेची तारीख सांगितल्यानंतर शरद पवारांनी एक इच्छा देखील व्यक्त केली. राज्यात काही डाव्या आघाडीचे पक्ष देखील आहेत. या पक्षांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठी मदत केली, हे पक्ष आमच्या सोबत राहिले. त्यामुळे आता जाग वाटपात त्यांचा विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.