chief minister uddhav thackeray : . या देशाची सेवा करायची आहे तर तुम्ही कोणत्या पदावर काम करता याकडे कोण लक्षं देतं. माझ्या मते राज्याचा मुख्यमंत्री असा व्हावा जो दिल्लीच्या समोर झुकलेला नाही आणि भविष्यात झुकणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात
सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ” राज्यात महिलांची सुरक्षा, वाढती महागाई, भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. या सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एक अशी गोष्ट नाही जिथे भ्रष्टाचार झाला नाही. सगळ्यात आधी हे आम्हाला साफ करावं लागेल. या देशाची सेवा करायची आहे तर तुम्ही कोणत्या पदावर काम करता याकडे कोण लक्षं देतं. माझ्या मते राज्याचा मुख्यमंत्री असा व्हावा जो दिल्लीच्या समोर झुकलेला नाही आणि भविष्यात झुकणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात. तसेच कॉंग्रेस पक्षाचा नेता सुद्धा मुख्यमंत्री बनू शकतो. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद नको आहे. हे शरद पवारांनी सांगितलं आहे”.
राष्ट्रवादीच्या विभाजनाचा फायदा आपण घेऊ
दुसरीकडे, आज पुण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत नाना पटोले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून महाविकासआघाडीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता आहे. नाना पटोले बैठकीत म्हणाले की, ” राष्ट्रवादीच्या विभाजनाचा आपण फायदा घेऊ, तसेच पुण्यातील जास्तीच्या जागा आपण पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू. पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे, परंतु आता कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे. वेळेवर ब्लॉकच्या मीटिंग व्हायला हव्यात. उमेदवार कोण आहे यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व द्या. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एक दिलाने काम केल्यास यश आपलेच आहे”. असा सल्ला नाना पटोले यांनी दिली आहे.