नितेश राणेंनी कुर्ल्यातील मशिदीत येऊन दाखवावं! भाजपच्याच नेत्याचं थेट चॅलेंज, राणे म्हणतात..

Maharashtra Politics: मशिदीत घुसून मारेन, अशी धमकी देणाऱ्या भाजप नेते नितेश राणेंना आता त्यांच्याच पक्षातील नेत्यानं खुलं आव्हान दिलं आहे. त्यामुळे वातावरण तापलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: मशिदीत घुसून मारु, अशी प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या, अल्पसंख्याक समाजाला धमकी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार नितेश राणेंना आता त्यांच्याच पक्षातील नेत्यानं आव्हान दिलं आहे. नितेश राणेंनी कुर्ल्यातील मशिदीत येऊन दाखवावं. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुर्ल्यातच आहे, असं खुलं आव्हान अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी दिलं आहे.

रामगिरी महाराजांविरोधात काहीही बोलाल, तर मशिदीत घुसून तुम्हाला मारु, इतकं लक्षात ठेवू, अशी धमकी नितेश राणेंनी अहमदनगरमधील एका कार्यक्रमात भाषण करताना दिली होती. ‘तुम्हाला जर तुमच्या समाजाची चिंता असेल, तर आमच्या रामगिरी महाराजांविरोधात काहीही बोलायचं नाही. अन्यथा आम्ही तोंड जागेवर ठेवणार नाही. तुम्हाला जी भाषा समजते, त्या भाषेत तुम्हाला धमकी देतोय,’ अशा शब्दांत नितेश राणेंनी उघड धमकी दिली होती. नगरमध्ये आयोजित हिंदू समाज आंदोलनात १ सप्टेंबरला त्यांनी हे विधान केलं.
Maharashtra Politics: लोकसभेला धाबे दणाणले, आता भाजप सावध; धाब्यावर जाऊ नका, ‘त्या’ नेत्यांना सूचना; कारण काय?
नितेश राणे आगलावी भाषा करत असताना त्यांच्याविरोधात कारवाई का केली जात नाही, असा सवाल विरोधकांनी विचारला. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर विरोधक तुटून पडले. यानंतर आता भाजपचेच नेते असलेल्या हाजी अराफत शेख यांनी राणेंना थेट आव्हान दिलं आहे. ‘नितेश राणेंनी कुर्ल्यात यावं. मी कुर्ल्यात राहतो. राणे कुर्ल्यात कधी येणार आहेत?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.
Maharashtra Politics: …तर विधानसभेला महायुतीचा प्रचार करणार नाही; पंकजा मुंडेंसमोर पदाधिकाऱ्याची स्पष्ट भूमिका
‘मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुर्ल्यातच आहे. राणेंनी कुर्ल्याच्या मशिदीत येऊन दाखवावं. ते कोणत्या नमाजावेळी मशिदीत येणार आहेत? त्यांनी ते सांगावं. आम्ही तिथे त्यांचं फुलांनी स्वागत करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांना मी सांगू इच्छितो की याला समजवा. जरा लगाम घाला,’ असं शेख म्हणाले.

Nitesh Rane: नितेश राणेंनी कुर्ल्यातील मशिदीत येऊन दाखवावं! भाजपच्याच नेत्याचं थेट चॅलेंज, राणे म्हणतात..

हाजी अराफत शेख यांनी थेट ओपन चॅलेंज दिल्यावर पत्रकारांनी याबद्दल नितेश राणेंना प्रतिक्रिया विचारली. त्यावर राणेंचा सूर काहीसा नरम होता. ‘या गोष्टीची दखल आमचे प्रदेशाध्यक्ष, मुंबईचे अध्यक्ष घेतील. मला त्यावर बोलण्याची गरज नाही. प्रदेशाध्यक्षांना हा विषय हाताळण्याचा पूर्ण अधिकार आहे,’ अशी त्रोटक प्रतिक्रिया देत राणेंनी विषयावर फारसं बोलणं टाळलं.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjp maharashtrabjp mumbaiDevendra Fadnavishaji arafat shaikhNitesh Raneनितेश राणे वादग्रस्त विधाननितेश राणेंना आव्हानभाजप नेत्यांमध्ये जुंपलीमहाराष्ट्र राजकीय बातम्याहाजी अराफत शेख
Comments (0)
Add Comment