बस संपकऱ्यांविरोधात एसटी महामंडळाची आक्रमक पावले, कंत्राटी पद्धतीने नव्याने कर्मचारी नेमणार

Mumbai ST Bus Employees Strike: सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांना वेठीस धरून संपकऱ्यांविरोधात राज्य परिवहन महामंडळाने आक्रमक पावले टाकत कंत्राटी चालक-वाहक आणि अन्य कर्मचारी नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हायलाइट्स:

  • राज्य परिवहन महामंडळाचे आक्रमक पावले
  • कंत्राटी चालक-वाहक आणि अन्य कर्मचारी नेमण्याची प्रक्रिया सुरू
  • तीन दिवसात निर्णय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
एसटी संप मोठी बातमी
महेश चेमटे, मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची गणेशोत्सव विशेष वाहतूक सुरू होताच एसटी कर्मचारी संघटनांनी मंगळवारी अघोषित संप पुकारल्याने राज्यभरातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. आज, बुधवारी राज्यात १,००६ उत्सव विशेष जादा गाड्या चालवण्याचे नियोजन होते. मात्र त्यावर ही परिणाम होऊ लागल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.

दुसऱ्या दिवशी तीव्रता वाढली

एसटी चालक-वाहकांअभावी अनेक स्थानक-आगारांत गाड्या उभ्या असल्याने संपाच्या पहिल्याच दिवशी महामंडळाला सुमारे १४ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे; तसेच मंगळवारी मध्यरात्रीनंतर या संपामध्ये आणखी १०० आगारांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.
Indians Killed In US Accident : एका अ‍ॅपमुळे एकत्र, अमेरिकेत चौघा भारतीयांचा भीषण अंत, अपघातानंतर गाडी पेटून जागीच कोळसा

राज्य परिवहन महामंडळाचं आक्रमक पाऊल

सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांना वेठीस धरून संपकऱ्यांविरोधात राज्य परिवहन महामंडळाने आक्रमक पावले टाकत कंत्राटी चालक-वाहक आणि अन्य कर्मचारी नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी दिवाळीच्या हंगामात संघटनांनी सुमारे सहा महिन्यांचा संप पुकारला होता.

३ दिवसात निर्णय?

‘म.रा.मा.प. महामंडळ हे प्रवाशांच्या वाहतुकीसंबंधी सेवा देणारी अग्रगण्य संस्था आहे. रा.प. महामंडळ मनुष्यबळ उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थेंकडून चालक करार पध्दतीने घेण्याबाबत इच्छुकता मागवत आहे. अवजड वाहन चालविण्याचा परवाना घेऊन किमान ०१ वर्ष पूर्ण असावे व अवजड वाहन अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे. अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना व पी.एस.व्ही. बॅच असणे आवश्यक आहे. इत्यादी बाबी पूर्ण करुन मुनष्यबळ उपलब्ध करुन देणाऱ्या अशा संस्था ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवसांच्या आत महाव्यवस्थापक (वाहतूक) म.रा.मा.प. महामंडळ, रा. प. मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्याकडे आपली मागणी नोंदवू शकतील’, अशी जाहिरात एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने प्रसिद्ध केली आहे.

राजकीय पक्षांनाही फटका?

मुंबईतून (१२) आणि ठाण्यातून (२२) एकूण ३४ गणपती विशेष एसटी गाड्या मंगळवारी कोकणासाठी रवाना झाल्या. महामुंबईतील विविध आगारांतून आज, बुधवारी मुंबईतून (३३७), ठाण्यातून (४८२) आणि पालघरमधून (१८७) एकूण १,००६ गाड्या चालवण्यात येणार आहेत. संपामुळे या गाड्या रद्द होण्याची भीती आहे. संप चिघळल्यास गुरुवारी ३,६१८ आणि शुक्रवारी २७६ गाड्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनी आरक्षित केलेल्या एसटी गाड्यांवरही संपाचा परिणाम जाणवणार आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

mumbai st bus strikest bus strike staff big newsst strikestate transport corporation staff contract basisएसटी बस संप कर्मचारी मोठी बातमीएसटी संप मोठी बातमीमुंबई एसटी बस संपराज्य परिवहन महामंडळ कर्मचारी कंत्राटी
Comments (0)
Add Comment