Shivaji Maharaj Statue Sculptor arrest : पोलिसांनी त्याची पत्नी निशिगंधा आपटे यांची पुन्हा चौकशी केली. त्यात पोलिसांना आपटे बुधवारी कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
Jaydeep Apte arrest : तोंडाला मास्क, डोक्यात टोपी, कसारा लोकलने आला, घराखाली पोलिसांनी हटकलं, जयदीप आपटेच्या अटकेचा थरारक घटनाक्रम
सिंधुदुर्ग पोलिसांसह कल्याण पोलिस जयदीप आपटे याचा शोध घेत होते. त्याच्या घराखाली दोन पथके तैनात होती. पोलिसांनी त्याची पत्नी निशिगंधा आपटे यांची पुन्हा चौकशी केली. त्यात पोलिसांना आपटे बुधवारी कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. कल्याण बाजारपेठ पोलिसांनी त्याला अटक करून, सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.
जयदीप आपटेच्या अटकेचा घटनाक्रम
कुटुंबीयांच्या भेटीसाठी जयदीप आपटे काल रात्री कल्याण येथील घरी निघाला. कसारा येथे लोकल पकडून तो कल्याण स्टेशनला उतरला. रेल्वे स्थानकातून कल्याणमधील दूधनाका परिसर त्याने गाठलं. तोंडावर मास्क आणि डोक्यावर टोपी घालून तो घराजवळ आला. यावेळी राहत्या घरी जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी जयदीपला हटकलं आणि पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितलं.
एकूण वर्णनावरुन पोलिसांना तो जयदीप आपटे असल्याची खात्री झाली. पोलिसांनी त्याच्यावर आवाज चढवताच जयदीप घाबरला. ततपप करत तो आपल्याला सोडण्यासाठी विनवणी करु लागला. इतक्यात बघ्यांची गर्दी जमा झाली. गर्दी आणि आवाजामुळे जयदीपला भेटण्यासाठी आई आणि पत्नी इमारतीखाली आल्या. परंतु पोलिसांनी जयदीपला घरी जाऊ दिलं नाही, त्याऐवजी डीसीबी स्क्वॉडकडे नेलं. त्यानंतर जयदीपला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
आधी धाकटा लेक गेला, मग मोठ्या मुलाची पुण्यात आत्महत्या, मायबापाने आठ दिवसातच मृत्यूला कवटाळलं, दोन चिठ्ठ्या सापडल्या
लूकआऊट नोटीस
तीन सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी जयदीप आपटेच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. त्यानुसार कोणत्याही राष्ट्रीय विमानतळावरून भारताबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात येणार होते.
दोन आठवड्यांनी सापडला
कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला त्याच्या कल्याणमधील घराखालून ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडून जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी झाल्यानंतर जयदीपला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.