Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. शिवभक्तांचा दबाव आणि रेटा इतका होता, शिल्पकार जयदीप आपटे यांचे बॉसही त्यांना वाचवू शकले नाहीत. मात्र अटक होण्याआधी सिंधुदुर्ग कोर्टात त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसांपासून सुरु आहे. त्यासंदर्भात ठाण्यातून सूत्रं हलत आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
३. खासगी अनुदानित शाळांमध्ये सन २०१८ पासून पूर्णवेळ शिपाईपदासाठी भरतीच झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील दहा हजारांवर शाळांमध्ये सुमारे साडेचार हजार पदांवर पूर्णवेळ शिपाईच नाहीत. या जागी कंत्राटी कर्मचारी नेमण्यात येत असून ते दर काही महिन्यांनी बदलत असतात. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेला ‘शिपाई काका’ हा घटक हरवत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर होत असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
४. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात असतानाच, दोन महिन्यांनंतर; नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले. त्यामुळे आता त्या दृष्टीने राजकारणाची चक्रे फिरायला सुरुवात झाली आहे.
५ गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 12 thFail या सिनेमाने प्रेक्षकांकडून भलीमोठी कौतुकाची थाप मिळवली. हा सिनेमा विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला. आज विधू यांचा ७२ वा वाढदिवस आहे. विधू चोप्रा यांचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांचे राष्ट्रपतींसमोरच ४००० रुपयांसाठी अडवाणींशी भांडण झालेले. विधू यांनी ४००० रुपयांसाठी अडवाणींची तक्रार राष्ट्रपतींकडे केलेली.
६. कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम व वांद्रे स्थानक पूर्व यांना वांद्रे-कुर्ला संकुलामार्फत (बीकेसी) जोडल्या जाणाऱ्या अत्याधुनिक व बॅटरी स्वयंचलित पॉड टॅक्सीसाठी कंत्राटदार कंपनी निश्चित झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीने मेसर्स साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांची या प्रकल्पासाठी कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे.
७. हार्दिक पंड्याशी नताशाने रीतसर घटस्फोट घेतला आहे. पण तरीही ती दीड महिन्यात मुंबईत दाखल होऊन हार्दिकला भेटायला का आली, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता. पण नताशा मुंबईत का आली, याचे महत्वाचे कारण आता समोर आले आहे. बातमी वाचा सविस्तर…
८. आजोळी गेलेल्या दोन्ही मुलांना अचानक ताप आला. पुजाऱ्याकडे नेऊन जडीबुटी घेतली. फरक पडला नाही आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच अवघ्या दीड तासांत दोघांचेही जीव गेले. मृतदेह गावाकडे परत न्यायचे होते. पक्का रस्ता नसल्याने अॅम्ब्युलन्स कामी येणार नव्हती. शेवटी जन्मदात्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किलोमीटरची पायपीट केली. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव गाठले. दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे वेदनादायी वास्तव मांडणारी ही घटना बुधवारी घडली.
९. जळगावातील सेवानिवृत्त महिला परिचारिका स्नेहलता चुंबळे (वय ६०) हत्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिलेसोबत पैसे काढायला गेलेल्या सहकाऱ्यानेच संबंधित महिलेची कारमध्ये गळा आवळून हत्या केली. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बातमी वाचा सविस्तर…
१०. शेअर मार्केटच्या ऐतिहासिक तेजीत विक्रमी गतीने IPO लाँच होत असताना एक नवीन वाद निर्माण झाला असून वादाचे मूळ विशेषतः लहान आयपीओ म्हणजे एसएमई आयपीओ ठरले आहेत. विविध छोट्या आयपीओंना गुंतवणूकदारांकडून आश्चर्यकारक प्रतिसाद मिळत असल्याचे पहायाला मिळत असताना आता अवघ्या काही दिवसांतच असाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.