Lalbaugcha Raja :अबब… लालबागच्या राजाला “इतक्या” कोटींचा मुकूट…पाहून डोळे दीपतील…

Expensive Donation to Lalbaugcha Raja : रिलायन्स फाउंडेशनने लालबागच्या राजाला १६ कोटी रुपये किंमत असलेला मुकुट दान केला आहे. हा मुकुट २० किलोचा असून त्यात पाचू आणि मीना ही रत्ने आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: संपूर्ण राज्यात गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईतील गणेशोत्सव हा सर्वांना आकर्षिक करत असतो, येथील गणेशोत्सव म्हटले की लालबागचा राजाचे नाव सर्व प्रथम समोर येते. लालबागच्या राजाचे पहिले दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. तसेच संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. अनेक स्टार आणि उद्योगपती तसेच राजकीय नेते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात.

यावेळी लालबागच्या राजाचे आकर्षण 20 किलोचा 16 कोटी रुपये किंमत असलेला मुकूट हे असणार आहे. या मुकुटात पाचू आणि मीना ही रत्ने घडवलेली असून त्याचा घेर सुमारे सहा फुटाचा आहे. रिलायन्स फाउंडेशनने दान केलेला हा मुकूट पाहण्यासाठी सर्व भाविक उत्सुक आहेत.
Rajkot Statue Incident: देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात लागलेल्या पोस्टरची राज्यभरात चर्चा; थेट महाराजांची माफी मागितली!

लालबागच्या राजाच्या आभूषणाची तसेच मंडपाची चर्चा नेहमी होत असते. यावेळी त्यात मुकुटाची भर पडली आहे त्याच बरोबर १० दिवस चालमाऱ्या या उत्सवासाठी मंडळाने ४००.५८ कोटी रुपायांचा विक्रमी विमा काढला आहे. गेल्या वर्षी मंडलाने ३६०.४० कोटी रुपयांचा विमा काढला होता. लालबागच्या राजाच्या मूर्तीचे पहिले दर्शन थोड्याच वेळात सर्वांना होईल. मंडळाकडून २४ तास दर्शन, पूजा, अन्नदान आणि सेवा सुरू असते. गणेशोत्सवाच्या १० दिवसात ६० हजार वेळा पूजा होते. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक दिवशी सरासरी २० हजार लोक दर्शन घेतात आणि एक लाख लोकांना अन्नदान दिले जाते.

मंडळाचे कोषाध्यक्ष मंगेश दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार विम्याच्या रक्कमेपैकी ३२५ कोटी रुपये हा सर्वात मोठा भाग मंडळाचे कार्यकर्ते, ट्रस्टी आणि सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक अपघातासाठी आहे. हा विमा अशा लोकांना आहे ज्यांना मंडळाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. प्रसाद खाल्ल्यामुळे जर काही झाले तर त्यासाठी १० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. या विम्याचा कालावधी १२ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर अशा दोन महिन्यांसाठी आहे.

या गोष्टींचा विमा

३२५ कोटी- मंडळाचे स्वयंसेवक, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्या वैयक्तीक अपघातासाठी
४३.१५ कोटी रुपये- सोने, चांदी आणि अन्य महत्त्वाच्या आभूषणाची चोरी झाल्यास
२ कोटी रुपये- आग, भूकंप आदी कारणांमुळे काही नुकसान झाल्यास
३० कोटी रुपये- मंडप आणि भक्तांना काही झाले तर
४३ लाख रुपये- आयोजनाचे स्थळ आणि अन्य गोष्टींसाठी

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

crown of lalbaugcha rajalalbaugcha raja mumbaiगणेशोत्सवगणेशोत्सव २०२४रिलायन्स फाउंडेशनकडून लालबागचा राजा मुकुटलालबागचा राजालालबागच्या राजाचा मुकुट
Comments (0)
Add Comment