Badlapur Firing: बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला आहे. एका व्यक्तीनं दोघांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्टेशन मास्तरांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण चार होते. त्यांच्यात आधी बाजारपेठेत आणि त्यानंतर रेल्वे स्थानकावर वाद झाला. त्यातील एकानं दोघांवर तीन राऊंड फायर केले. त्यात एकाच्या पायाला गोळी चाटून गेली. ज्याला गोळी लागली तो त्याच्या सहकाऱ्यासोबत उपचारासाठी पळून गेला. गोळबार करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता सिटी पोलीस आणि रेल्वे पोलीस त्याचा जबाब नोंदवत आहेत..