mallikarjun kharge on ladki bahin yojana : राज्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेंतर्गत 2000 हजार रुपये देणार. तुम्ही तुमचा सन्मान मोदींसमोर गहाण ठेवणार का? असं खर्गे म्हणाले आहेत.
लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ”राज्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेंतर्गत 2000 हजार रुपये देणार. तुम्ही तुमचा सन्मान मोदींसमोर गहाण ठेवणार का? सरकारे फोडण्या तोडण्यापेक्षा तुम्ही काय वेगळं केलं आहे ते आम्हाला सांगा. महाराष्ट्र जिंकला तर सारा देश जिंकणार आहे. लवकरच भाजपची सत्ता जाणार आहे”. असं खर्गे म्हणाले आहेत.
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवरून खर्गे आणि राहुल गांधी यांची मोदींवर टीका
राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवरून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ”मोदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला. राम मंदिराला हात लावला ते गळत आहे. गुजरातमध्ये पुलाचे उद्घाटन केलं तो पडला”. असं म्हणत खर्गे यांनी निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी म्हणाले की, ”काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि माफी मागून गेले. आपल्या हातून चूक होते, तेव्हाच माफी मागितली जाते. म्हणजे मोदींना चूक झाल्याचं मान्य आहे का?, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विचारला. मोदींनी माफी नेमकी कशाबद्दल मागितली? संघाच्या माणसाला अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम दिलं त्याबद्दल मोदींनी माफी मागितली की पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मोदींनी क्षमा मागितली. अशा प्रश्नांचा भडिमार राहुल गांधी यांनी केला होता.