Pune Vanraj Andekar Murder New Update: वनराज आंदेकर याचा एक सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास नाना पेठ येथे खून करण्यात आला. सुरुवातीला हा खून कौटुंबिक वादातून केल्याचे सांगण्यात येत होते.
हायलाइट्स:
- ‘खुनाचा कट ते हल्ला’ चोवीस तासांत
- आंदेकर खून प्रकरणाच्या पोलिस तपासातून माहिती
- असा केला हल्ला…
Pune Vanraj Andekar Murder: खुनाचा कट ते हल्ला २४ तासात, अशी केली हत्या; आंदेकर प्रकरणात पोलिस तपासात मोठी माहिती
Vanraj Andekar Murder: वनराज आंदेकर हत्या; प्रकरणाच्या तपासाचा आवाका मोठा, १० आरोपींना पोलिस कोठडी
दरम्यान, वनराजच्या खुनाचा कट निश्चित झाल्यावर सोमनाथने अनिकेतला फोन करून एक वर्षापूर्वी आणून ठेवलेल्या हत्याराबाबत विचारणा केली. अनिकेतने हत्यारे असल्याचे सांगितले. अनिकेतने यापूर्वी कधी पिस्तुल चालवले नसल्याचे सांगितले असता, त्यावर सोमनाथने पिस्तुलासोबत कोयते, चाकूदेखील सोबत ठेवण्यास सांगितले. खुनाच्या दिवशी स्वतः अनिकेतने नाना पेठ परिसरात रेकी केली. वनराज थांबत असलेल्या ठिकाणांची माहिती घेतली आणि खून केल्यानंतर पळ कसा काढायचा याचे नियोजन केले.
असा केला हल्ला…
– अनिकेतने आकाश म्हस्केला सोबत घेऊन मुले गोळा केली.
– दुचाकी घेऊ सर्व जण मार्केट यार्ड परिसरात जमले. त्यांनी टोळक्याने नाना पेठ गाठली.
– उदयकांत आंदेकर चौकात वनराज दिसताच, अनिकेत दुधभाते, ओम खैरे आणि इतरांनी सुरुवातीला गोळ्या झाडल्या.
– म्हस्के याने पहिली गोळी झाडली. तुषार कदमचे पिस्तूल चालले नाही. समीर काळेच्या पिस्तूलातून मिसफायर झाले.
– गोळ्या वनराजला लागल्या नसल्याच्या शंकेतून ओम खैरे, अनिकेत दुधभाते आणि इतर दोघांनी वनराजवर कोयत्याने वार केले.
प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते हे तिघे वनराज आंदेकर खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे. मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य आदी खुनामागील कारण असल्याचे दिसून येते. आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली असून, तीन विधिसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर