Budhana Rain: दमदार पावसामुळे संत चोखासागर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील संत चौखासागर धरण तुडुंब भरले आहे. धरणातील पाणीसाठा केव्हाही वाढू शकतो त्यामुळे तहसीलदार डोंगरजाळ यांनी धरण काठावरील नागरिकांना गुरे ढोरे इतरत्र हलविण्याचे आवाहन केले आहे. 5 सप्टेंबरला पाणीपातळी 520 पूर्णांक 300 मि. मी झाली असून धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस. तसेच खडकपूर्णा प्रकल्पाचा पाणलोट क्षेत्रातून येणारा परिघानुसार धरण परिचलन सूची अंतर्गत पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता यापुढे रात्रपाळीत कधीही धरणाचे वक्राकार दरवाजे उघडून पाणी सोडण्याची गरज पडणार आहे. याकरिता खडकपूर्णा नदीकाठाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.