Beed Minor Girl Assault: पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील मोमीनपुरा भागात एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी ही ११ वर्षीय विद्यार्थिनी जात होती.
हायलाइट्स:
- ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
- नराधमाला पोलिसांनी केली अटक
- बीडमध्ये धक्कादायक घटना
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील मोमीनपुरा भागात एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी ही ११ वर्षीय विद्यार्थिनी जात होती. त्याठिकाणी या सदरील विद्यार्थिनीवर सतत तीन महिने अत्याचार केला. तीन महिन्यापासून विद्यार्थिनीने कोणालाही काही याबाबत सांगितले नाही. अखेर या अत्याचाराला कंटाळून अखेर त्या मुलीने आपल्या आई वडिलांना याबाबत सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तात्काळ पेठ बीड पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पेठ बीड पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पेठ बीड पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. ही घटना निंदनीय असून समाजाला काळीमा फासणारी आहे.
माजी आमदाराच्या गाडीवर बीडमध्ये दगडफेक
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दहिफळ वडगाव येथे आल्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी ६:०० वाजता त्या ऋषी गदळे यांच्याकडे घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाल्या. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार करण्यात आला.