मुंबई १० दिवस शहरात ५ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त, हेल्प डेस्कची सुविधा; गणेशोत्सवासाठी १० दिवसांचा ट्रॅफिक अलर्ट

Ganeshotsav 2024 Mumbai Traffic : मुंबईत १० दिवस गणेशोत्सव काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात वाहतुकीच्या काही मार्गात बदल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलं आहे. या ७ ते १७ सप्टेंबर या १० दिवसांच्या गणेशोत्सव काळात वाहनं तसंच पादचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. १० दिवस गणेशोत्सवासाठी पोलिसांनी शहरात ५ हजारांहून अधिक पोलीस तैनात केले आहेत. लोकप्रिय गणपती मंडळ लालबाग, गिरगाव, अंधेरी याभागात दीड, पाच, सात आणि दहा दिवस अर्थात अनंत चतुर्दशीपर्यंत मोठा बंदोबस्त असणार आहे.

हेल्प डेस्कची सुविधा

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी पोलिसांनी हेल्प डेस्क उभारले आहेत. रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच वाहतूक सुरळीत व्हावी आणि वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या १० दिवसांच्या काळात भाविकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी बेस्टच्या बसेस, लोकल ट्रेन आणि मेट्रो सेवांमध्येही समन्वय साधला आहे. लोकांना हा सण शांततेत साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Nagpur News : इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा कागद, नागपुरात इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं?

सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन

लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले असून ते दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले आहेत. लालबाग राजाच्या आजूबाजूचे रस्ते गर्दीच्या वेळी वाहनांना वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. मात्र वाहतूक विस्कळित होऊ नये, यासाठी आपत्कालीन वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. अवजड वाहनांना मंडळांच्या आजूबाजूने गर्दीच्या वेळी मनाई आहे. मात्र भाजी विक्रेते, डॉक्टर, मेडिकल या सेवांशी संबंधित वाहनांना यात सूट आहे.

या पुलावरुन जाणाऱ्या गणपती मंडळांसाठी विशेष निर्बंध

मध्य रेल्वे अंतर्गत
– घाटकोपर आरओबी
– करी रोड
– चिंचपोकळी आर्थर रोड जेल
– भायखळा

मुंबई १० दिवस शहरात ५ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त, हेल्प डेस्कची सुविधा; गणेशोत्सवासाठी १० दिवसांचा ट्रॅफिक अलर्ट

पश्चिम रेल्वे अंतर्गत
– मरिन लाइन्स
– सँडहर्स्ट रोड
– फ्रेंच आरओबी
– कॅनेडी
– महालक्ष्मी
– प्रभादेवी
– दादर टिळक आरओबी

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Ganeshotsav 2024ganeshotsav mumbai trafficmumbai traffic police advisoryगणेशोत्सव २०२४मुंबई गणेशोत्सव ट्रॅफिकमुंबई गणेशोत्सव हेल्प डेस्क
Comments (0)
Add Comment